ट्विंकल खन्नामुळे नाहीच तर या अभिनेत्रीमुळे अक्षय कुमार ‘सुपरस्टार’ झाला, अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 08:10 IST2023-10-27T08:09:00+5:302023-10-27T08:10:02+5:30

अक्षयला घडवण्यामागे ट्विंकल खन्ना नाही तर बॉलिवूडच्या दुसऱ्याच अभिनेत्रीचा हात आहे.

Pooja batra birthday actress had big contribution making akshay kumar superstar | ट्विंकल खन्नामुळे नाहीच तर या अभिनेत्रीमुळे अक्षय कुमार ‘सुपरस्टार’ झाला, अन्....

ट्विंकल खन्नामुळे नाहीच तर या अभिनेत्रीमुळे अक्षय कुमार ‘सुपरस्टार’ झाला, अन्....

अक्षय कुमार आज बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. पण या अक्षयला घडवण्यामागे ट्विंकल खन्ना नाही तर पूजा बत्राचा हात आहे. बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा हिने अक्षयला स्ट्रगलकाळात प्रचंड मदत केली. दोघांची ओळख थेट मॉडेलिंगच्या दिवसापासूनची. आज पूजा तिचा वाढदिवस साजरा करतेय. 

पूजाने 1993 साली मिस इंडियाचा किताब जिंकला होता. यानंतर पूजा मॉडेलिंगमध्ये आली आणि नंतर बॉलिवूडमध्ये. बॉलिवूडमध्ये येताच विरासत हा तिचा सिनेमा हिट झाला होता. लोकांनी पूजाला डोक्यावर घेतले होते. याऊलट अक्षय कुमार अगदी नवखा होता. इंडस्ट्रीत त्याला कुणीही ओळखत नव्हते. मॉडेलिंगच्या दिवसात अक्षय आणि पूजाची ओळख झाली होती. असं म्हणतात की, बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सुद्धा केवळ पूजा बत्रामुळे अक्षय कुमारला एंट्री मिळायची. आज अक्षय बॉलिवूडच्या पार्ट्यांना जात नाही. पण स्ट्रगलच्या काळात अक्षयने पूजासोबत पार्ट्यांना जाणे सुरु केले आणि इंडस्ट्रीतील अनेकांशी ओळख वाढवली.

करिअरच्या सुरूवातीला पूजानेच अक्षयला मदतीचा हात दिला. जिथे जिथे तिच्या ओळखी होत्या तिथे ती अक्षयची शिफारस करत त्याला काम मिळवून द्यायची. पण पुढे, अक्षय मोठा स्टार झाला आणि बघता बघता स्ट्रगल काळात साथ देणाºया पूजाला सुद्धा विसरला. दरम्यानच्या काळात पूजाच्या करिअरची नौकाही डगमगू लागली होती. अशात तिनं लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सर्जन सोनू आहलूवालियासोबत पूजानं लग्न केलं. अर्थात लग्नाच्या 9 वर्षानंतर पूजाने सोनूपासून घटस्फोट घेतला. पूजाला लग्नानंतर लगेच मुलं नको होतं. याच मुद्यावरून सोनू व तिच्यात मतभेद निर्माण झालेत आणि दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर 2019 मध्ये वयाच्या 42 व्या वर्षी पूजाने अगदी गुपचूप अभिनेता नवाब शहा सोबत दुसरा संसार थाटला. सोशल मीडियावर पूजा सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. 
 

Web Title: Pooja batra birthday actress had big contribution making akshay kumar superstar