कृपया 'हेरा फेरी ३'मध्ये परत या!, चाहत्याने केलेल्या विनंतीला परेश रावल यांनी दिलं हे उत्तर, म्हणाले-

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:54 IST2025-06-09T12:53:58+5:302025-06-09T12:54:48+5:30

परेश रावल यांना 'हेरा फेरी ३' मध्ये परतण्याची विनंती एका चाहत्याने केली. त्यावर परेश रावल यांनी मोजक्या शब्दात दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे

Please come back in Hera Pheri 3 a fan requested Paresh Rawal gave this answer | कृपया 'हेरा फेरी ३'मध्ये परत या!, चाहत्याने केलेल्या विनंतीला परेश रावल यांनी दिलं हे उत्तर, म्हणाले-

कृपया 'हेरा फेरी ३'मध्ये परत या!, चाहत्याने केलेल्या विनंतीला परेश रावल यांनी दिलं हे उत्तर, म्हणाले-

 'हेरा फेरी ३' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे.  या सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरु होणार होतं. परंतु अचानक 'हेरा फेरी ३' परेश रावल यांनी सोडल्याने सर्वांना धक्का बसला. परेश रावल पुन्हा 'हेरा फेरी ३'मध्ये येणार नाहीत, हे आता जवळपास निश्चितच आहे. त्यामुळे 'हेरा फेरी ३'ची आतुरतेने वाट बघणाऱ्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला. अशातच ट्विटरवर X  एका चाहत्याने परेश रावल यांना 'हेरा फेरी ३'मध्ये परतण्याची विनंती केली. तेव्हा परेश रावल काय म्हणाले, बघा

'हेरा फेरी ३'मध्ये परत या

परेश रावल हे सध्या ट्विटरवर चांगलेच सक्रीय आहेत. परेश रावल यांना एका चाहत्याने टॅग  करुन लिहिलं की, "पुन्हा एकदा हेरा फेरीमध्ये मध्ये जॉईन होण्याचा विचार करा, तुम्ही या सिनेमाचे हिरो आहात.." यावर परेश रावल यांनी चाहत्याला रिप्लाय करताना लिहिलं की, "नाही... या सिनेमात एकूण तीन हिरो आहेत." असं परेश यांनी एका वाक्यात उत्तर देऊन  'हेरा फेरी'चे इतर सहकलाकार अर्थात अक्षय कुमार, परेश रावल यांच्याविषयी आदर व्यक्त केला. पण या उत्तरावरुन परेश रावल  'हेरा फेरी ३'मध्ये परतणार नाहीत, असंच दिसतंय. 

परेश रावल यांनी का सोडला  'हेरा फेरी ३'?

परेश रावल यांनी  'हेरा फेरी ३' मानधनाच्या कारणामुळे सिनेमा सोडला का? अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यावर परेश रावल म्हणाले, "प्रेक्षकांच्या प्रेमाची तुलना पैशांसोबत होऊच शकत नाही. सध्या मला ही भूमिका करायची नाही इतकंच यामागचं कारण आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला पण मला खरोखरंच या घडीला ही भूमिका साकारायची इच्छा नाही असंच मी त्यांना सांगितलं. आम्ही सोबत अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत आणि यापुढेही करु. आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत आणि होणारही नाहीत."

बाबूराव म्हणजे गळ्याला लागलेला फास

काही दिवसांपूर्वीच लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी त्यांच्या गाजलेल्या बाबूरावच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली होती. या भूमिकेचा आता त्यांना कंटाळा आल्याचं ते म्हणाले होते. हेरा फेरी सिनेमा म्हणजे गळ्याला लागलेला फास असंही ते मुलाखतीत म्हणाले होते. त्यामुळे एकूणच इच्छा नसल्याने परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मध्ये काम करायला नकार दिला, हे स्पष्ट आहे.

Web Title: Please come back in Hera Pheri 3 a fan requested Paresh Rawal gave this answer