Urfi Javed: शरीरावर कपड्यांऐवजी चिकटवले फोटो, समोर आला उर्फी जावेदचा सुपरहॉट लूक, फॅन्स म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:00 IST2022-03-29T13:59:33+5:302022-03-29T14:00:57+5:30
Urfi Javed Photos: अभिनेत्री उर्फी जावेद हिचा नवा लूक पाहून फॅन्स अवाक झाले आहेत. आता तुम्ही म्हणाल की, यामध्ये नवं ते काय आहे. उर्फीचा प्रत्येक लूक फॅन्सना आश्चर्याचा धक्का देत असतो. मात्र यावेळी गोष्ट थोडी वेगळी आहे.

Urfi Javed: शरीरावर कपड्यांऐवजी चिकटवले फोटो, समोर आला उर्फी जावेदचा सुपरहॉट लूक, फॅन्स म्हणाले...
मुंबई - अभिनेत्री उर्फी जावेद हिचा नवा लूक पाहून फॅन्स अवाक झाले आहेत. आता तुम्ही म्हणाल की, यामध्ये नवं ते काय आहे. उर्फीचा प्रत्येक लूक फॅन्सना आश्चर्याचा धक्का देत असतो. मात्र यावेळी गोष्ट थोडी वेगळी आहे. उर्फीने कुठलाही अतरंगी किंवा कटआऊट ड्रेस घातलेला नाही. तर तिने आपल्या शरीरावर केवळ आपले फोटो चिकटवून नवा लूक क्रिएट केला आहे.
आपल्या हटके आणि बोल्ड फॅशन सेन्ससाठी फेमस असलेल्या उर्फी जावेदचा नवा लूक पाहून फॅशनच्याबाबतीत तिची कुणासोबतही तुलना होऊ शकत नाही, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. उर्फी जावेदने खरोखरच बोल्डनेसची हद्द ओलांडली आहे. यावेळी तिने कुठलाही कटआऊट किंवा रिविलिंग ड्रेस घातलेला नाही. तर आपल्या नव्या लूकच्या माध्यमातून तिने फॅशन वर्ल्डमध्ये एक नवा स्टँड सेट केला आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमध्ये उर्फी केवळ तिच्या शरीरावर तिचे फोटो चिकटवलेल्या अवस्थेत दिसत आहे. तिने तिच्या या लूकला खास मेकअपसह कंप्लिट केलं आहे. उर्फीने ब्राउन न्यूड ग्लॉसी लिपस्टिक, न्यूड आयशॅडो, आयलायनर आणि मस्कारा लावून आपल्या मेकअपला खास बनवले आहे. सॉफ कुरळ्या केसांमध्ये उर्फी ग्लॅमरस क्विन दिसत आहे.
उर्फीने आपला हटके लूक शेअर करताना कॅप्शनमध्ये सांगितले की, ही कल्पना मला इंटरनेटवर पाहून सूचली. मी ती क्रिएक करू इच्छित होते आणि ती मी क्रिएट केली.उर्फीचा गा लूक पाहून अनेक फॅन्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका युझरने लिहिले की, ही काय स्टाईल आहे? तर अन्य एका युझरने उर्फीला ट्रोल करत विचारले की, फोटो फ्रेम बनून कुठे फिरत आहेस. तर अनेक फॅन्स मात्र तिच्या या लूकला पसंती देत आहेत.