Dhurandhar 2 in Pakistan: बंदी असूनही पाकिस्तानातील टीव्हीवर दिसतोय 'धुरंधर २', हे कसं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:14 IST2026-03-20T15:07:33+5:302026-03-20T15:14:55+5:30

१९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करून नवा इतिहास रचला आहे. भारतात या चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत असतानाच, पाकिस्तानमध्येही या चित्रपटाची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

people in pakistan watch dhurandhar 2 pirated version in their home tv | Dhurandhar 2 in Pakistan: बंदी असूनही पाकिस्तानातील टीव्हीवर दिसतोय 'धुरंधर २', हे कसं काय?

Dhurandhar 2 in Pakistan: बंदी असूनही पाकिस्तानातील टीव्हीवर दिसतोय 'धुरंधर २', हे कसं काय?

रणवीर सिंगचा बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करून नवा इतिहास रचला आहे. भारतात या चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत असतानाच, पाकिस्तानमध्येही या चित्रपटाची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानमध्ये चित्रपटावर बंदी, पण...

पाकिस्तानमध्ये सध्या भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर अधिकृतपणे बंदी आहे. विशेषतः 'धुरंधर २' हा चित्रपट पाकिस्तानातील दहशतवादावर आधारित असल्याने तिथे हा सिनेमा रिलीज झाला नाही. मात्र, असं असूनही पाकिस्तानातील प्रेक्षकांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तानमधील लोक चोरीछुपे या चित्रपटाचे 'पायरेटेड व्हर्जन' (Pirated Version) डाऊनलोड करून पाहत असल्याचे समोर आले आहे. 

 ट्विटरवर एका पाकिस्तानी पत्रकाराचे ट्विट व्हायरल झालं आहे. या फोटोमध्ये तो पत्रकार लाहोरमधील आपल्या घरी बसून टीव्ही स्क्रीनवर 'धुरंधर २' चा आनंद घेताना दिसत आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "हे अत्यंत दुर्दैवी आहे की चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच त्याचे पायरेटेड व्हर्जन पाकिस्तानमध्ये पोहोचले आहे. पाकिस्तानी लोक भारतीय सिनेमाशिवाय राहू शकत नाहीत, मग तो चित्रपट पाकिस्तानशी संबंधित दहशतवादावर आधारित असला तरीही ही माणसं तो सिनेमा बघतीलच.''

त्यामुळे एकूणच 'धुरंधर'च्या पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भाग पाहण्यासही लोक उत्सुक आहेत. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी १०२.५५ कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली आहे. रणवीर सिंगच्या या चित्रपटाने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. याआधी 'धुरंधर'च्या पहिल्या भागाचेही पायरेटेड व्हर्जन पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहिले गेले होते.

Web Title : पाकिस्तान में 'धुरंधर 2' प्रतिबंधित, फिर भी टीवी पर स्ट्रीमिंग!

Web Summary : प्रतिबंध के बावजूद, 'धुरंधर 2', आतंकवाद पर आधारित फिल्म, पाकिस्तान में बहुत लोकप्रिय है। लोग भारतीय सिनेमा में उत्सुकता और रुचि के कारण पायरेटेड संस्करण देख रहे हैं।

Web Title : 'Dhurandhar 2' Banned in Pakistan, Yet Streaming on TV!

Web Summary : Despite a ban, 'Dhurandhar 2', a film about terrorism, is hugely popular in Pakistan. People are watching pirated versions at home, driven by sheer curiosity and interest in Indian cinema.