Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या 'मन्नत'वरील २५ लाख किमतीची नेमप्लेट अचानक गायब! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 16:43 IST2022-05-28T16:41:36+5:302022-05-28T16:43:16+5:30

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानच्या आलिशान बंगल्याबाहेरील नेम प्लेट अनाचक गायब झाली असून, त्याची किंमत २५ लाख रुपये आहे.

pathan star shah rukh khan house mannat 25 lakh name plate missing | Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या 'मन्नत'वरील २५ लाख किमतीची नेमप्लेट अचानक गायब! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या 'मन्नत'वरील २५ लाख किमतीची नेमप्लेट अचानक गायब! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या आलिशान 'मन्नत' या त्याच्या राहत्या बंगल्याची सध्या बरीच चर्चा आहे. 'मन्नत' पाहण्यासाठी ठिकठिकाणाहून चाहते येत असतात. आपला लाडका कलाकार दिसला नाही, तरी 'मन्नत' बाहेर सेल्फी टिपणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. पण यावेळी 'मन्नत' बाहेरील चाहत्यांच्या गर्दीमुळे नव्हे, तर एका वेगळ्याच कारणासाठी शाहरुखचा बंगला चर्चेचा विषय ठरत आहे. 'मन्नत'बाहेर लावण्यात आलेली तब्बल २५ लाख रुपये किमतीची नेमप्लेट अचानक गायब झाली आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील बादशाह शाहरुख खानचा आलिशान बंगला मुंबईतील ब्रँड स्टँड येथे आहे. 'किंग खान'ची एक झलक पाहण्यासाठी 'मन्नत'च्या घराबाहेर चाहते नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित असतात. अशा परिस्थितीत अलीकडेच शाहरुखच्या बंगल्याबाहेरची 'मन्नत' नावाची पाटी गायब झाल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं आहे. याची सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा रंगू लागली  आहे. शाहरुखच्या बंगल्याची नेम प्लेट काढावी लागली यामागचं कारण काय असेल याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच 'मन्नत'वर २५ लाख रुपयांची नवीन नेम प्लेट लावण्यात आली होती.

'मन्नत'वर दुरुस्तीचं काम
शाहरुखच्या बंगल्यावर सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळेच नेमप्लेट काढण्यात आली आहे असा दावा माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तातून करण्यात आला आहे. दुसरीकडे सोशल मीडियात 'मन्नत' नावाची पाटी काढण्यात आल्यानंतरचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. काहींनी तर नेमप्लेट चोरीला गेली असल्याचं म्हटलं आहे. पण याबाबतची अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही. येत्या काळात यामागचं खरं कारण समोर येईल. शाहरुख सध्या आपल्या आगामी 'पठाण' चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे.

Web Title: pathan star shah rukh khan house mannat 25 lakh name plate missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.