Besharam Rang Viral Video: गावाकडल्या मुलांचा 'बेशरम रंग' डान्स पाहाच... वाद विसरून दीपिकालाही आवरणार नाही हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 20:08 IST2022-12-16T20:06:33+5:302022-12-16T20:08:15+5:30
पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्याने रिलीज झाल्यापासूनच सोशल मीडियावर वाद सुरू आहेत.

Besharam Rang Viral Video: गावाकडल्या मुलांचा 'बेशरम रंग' डान्स पाहाच... वाद विसरून दीपिकालाही आवरणार नाही हसू
Besharam Rang Video: बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणे जितके जास्त पसंत केले जात आहे, तितकेच ते ट्रोल होत आहे. गाण्यातील काही दृश्यांवरून सुरू असलेला वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीए. अनेक संघटनांनी निर्मात्यांवर हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. पण या सर्व वादांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुलांनी बेशरम रंग गाण्यावर अशा पद्धतीने डान्स केला आहे की दीपिका आपलं हसू रोखू शकणार आहे.
पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरून निर्माण झालेल्या सर्व वादांच्या दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओने सर्वच वादांवर तोडगा शोधला आहे. भगवे कापड नाही, अवाच्या सवा खर्च नाही, जबरदस्तीने चित्रित दृश्य नाहीत. साध्या आणि नैसर्गिक पद्धतीने चित्रित केलेल्या बेशरम रंग गाण्याच्या या व्हिडीओने जणून सारेच वादच मिटवून टाकले आहेत असे मजेशीरपणे नक्कीच म्हणता येईल. पाहा तो व्हिडीओ-
A new version of "Besharam Rang" is released, so no one's sentiments are hurt. pic.twitter.com/cxnFjKUnOX
— Narundar (@NarundarM) December 15, 2022
हा डान्स सादर करणाऱ्या मुलांनी बेशरम रंग या गाण्याच्या प्रत्येक तपशीलाची बारीक नोंद केली आहे. दीपिका पदुकोणच्या सिझलिंग स्टान्सपासून तिच्या प्रत्येक डान्स मूव्ह्सपर्यंत चाहत्यांनी ते व्हिडीओ साँग रिक्रिएट केले आहे. व्हिडिओमध्ये, नदीच्या काठावर पठाणच्या गाण्यावर काही मुलं कशी परफॉर्म करत आहेत, हे तुम्ही पाहू शकता. दुसरीकडे, दीपिका बनलेल्या मुलाच्या मागे काही मुलं स्वतःच्याच दुनियेत मश्गुल होते.