राघव चड्ढांना पहिल्यांदा भेटल्यानंतर परिणीतीने गूगल केलेल्या 'या' गोष्टी, कपिलच्या शोमध्ये खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:16 IST2025-08-04T10:15:53+5:302025-08-04T10:16:13+5:30
परिणीती-राघवची लव्हस्टोरी कशी सुरु झाली?

राघव चड्ढांना पहिल्यांदा भेटल्यानंतर परिणीतीने गूगल केलेल्या 'या' गोष्टी, कपिलच्या शोमध्ये खुलासा!
Parineeti googled Raghav Chadha: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) 'आम आदमी पार्टी' नेता राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांच्याशी २४ सप्टेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. उदयपूरमध्ये दोघांचा शाही विवाहसोळहा पार पडला. या जोडीची प्रेमकहाणी ही खूप रंजक आहे. परिणीती आणि राघव यांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. तेव्हा राघव यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर परिणीतीने त्यांच्याविषयी काही खास गोष्टी गूगलवर शोधल्या होत्या. त्या गोष्टी काय होत्या, ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
नुकंतच परिणीती चोप्रा आणि राघव यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये हजेरी लावली. यावेळी या जोडीनं त्यांची पहिली भेट नेमकी कुठे झाली आणि त्यांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत येऊन कशी पोहोचली, याबद्दल सांगितलं. कपिलनं परिणीती व राघव यांना त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारलं. तेव्हा परिणीती म्हणाली, "आम्ही पहिल्यांदा लंडन येथे भेटलो होतो. आम्हाला ब्रिटिश काउन्सिलकडून पुरस्कार मिळणार होता. त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी आणि मला अभिनय क्षेत्रातील कामासाठी. माझे दोन्ही लहान भाऊ त्याचे चाहते आहेत, त्यांनी मला त्यांच्यावतीने राघव यांना 'हॅलो' बोलायला सांगितलं. योगायोगाने तो माझ्या शेजारी बसला होता, त्यामुळे मी त्याच्याशी संवाद साधला".
पुढे तिनं सांगितलं की, "तेव्हा शिष्टाचार म्हणून मी सहज म्हटलं की, भेटू दिल्लीत गेल्यानंतर कधी. तर यावर राघव यांनी लगेच दुसऱ्याच दिवशी मला 'ब्रेकफास्ट'साठी आमंत्रण दिलं. मी त्या वेळी माझ्यासोबत पाच लोकांना घेऊन गेले होते. त्याच्यासोबतही त्याचे काही सहकारी होते. जवळपास १२-१५ लोक असे मिळून आम्ही 'ब्रेकफास्ट' केला. त्यानंतर राघव यांनी माझा नंबर घेतला आणि आमचं बोलणं सुरू झालं".
कपिलच्या शोमध्ये राघव चड्ढा यांनी खुलासा केला की, "पहिल्या भेटीनंतर परिणीतीने माझ्याबद्दल गूगलवर शोधलं होतं. माझं वय काय आहे? मी आधी लग्न केलेलं आहे का? संसद सदस्य काय करतात? याची तिनं माहिती घेतील". परिणीतीनेही हे कबूल करत हसून सांगितलं की, "हो, मी त्याची उंची किती आहे हे सुद्धा गूगल केलं होतं, कारण मला उंच पुरुष आवडतात. तो माझ्यापेक्षा उंच होता, त्यामुळे वाटलं की तो योग्य जोडीदार ठरू शकतो".