परिणीती-राघवच्या संगीत कार्यक्रमातील फोटो समोर; परिणीती-राघवचा खास लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 19:40 IST2023-09-24T18:50:19+5:302023-09-24T19:40:51+5:30
परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांच्या संगीत सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

Parineeti Chopra-Raghav Chadha
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा आज विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थानच्या उदयपूरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. शनिवारी रात्री संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही कुटुंबातील पाहुण्यांनी गाण्यांवर डान्स केला. या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलंय. तर आणखी काही नवीन फोटो शेअर करण्याची विनंती चाहते करताना दिसत आहेत.
पंजाबी गायक नवराज हंसने संगीत सोहळ्यात लाइव्ह परफॉर्म केला. यावेळी सर्व पाहुण्यांणी खूप एन्जॉय केला. समोर आलेल्या फोटोमध्ये संगीत सोहळ्यातील परीणिती आणि राघवचा खास लुक दिसून आला. यावेळी परिणीतीने सिल्व्हर शिमरी लेहेंगा परिधान केला होता. ती लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. तर राघव यांनी ब्लॅक कलरचं ड्रेसिंग केलं होतं. दोघेही यावेळी खूपच आनंदी दिसत होते.
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्न सोहळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मनीष मल्होत्रा, सानिया मिर्झा यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. परिणीती-राघवच्या शाही लग्नात चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.