एकेकाळी केक आणायलाही नव्हते पैसे, पण आज ही अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:09 IST2025-03-06T11:57:10+5:302025-03-06T12:09:58+5:30

आजच्या घडीला अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे. 

Parineeti Chopra Cut Rasgulla Instead Of Cake On Her Birthday In Childhood | एकेकाळी केक आणायलाही नव्हते पैसे, पण आज ही अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

एकेकाळी केक आणायलाही नव्हते पैसे, पण आज ही अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी मेहनतीच्या बळावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. फोटोत दिसणारी चिमुकली आज बी-टाउनची टॉप अभिनेत्री आहे. पण, तिचं बालपण गरीबीत गेलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने अनेक चढ-उतार पाहिले. अभिनेत्रीला खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांकडे वाढदिवशी केक आणण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. पण आजच्या घडीला अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे. 


ऐक वेळ होती जेव्हा अभिनेत्रींच्या वडिलांकडे Cake आणायलाही पैसे नव्हते. वाढदिवशी केकऐवजी ती रसगुल्ला कापायची. ती अभिनेत्री आहे परिणीती चोप्रा (Parineeti Chopra). 'मॅशबेल मिडल ईस्टशी' बोलताना ती म्हणाली, "माझे बालपण काही खास नव्हतं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. वडिलांकडे माझ्या वाढदिवसाला केक खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. केक ऐवजी ते बाजारातून फक्त एकच रसगुल्ला आणत असत. कधीकधी ते रसमलई देखील आणायचे".


परिणीती ही सुपरस्टार प्रियंका चोप्राची चुलत बहीण आहे. तिने चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून खूप नाव कमावलं आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी तिने आप खासदार राघव चढ्ढा यांच्याशी लग्न केलं.  परिणीतीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'लेडीज व्हर्सेस लकी बहल' या चित्रपटातून केली होती. यानंतर, ती अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसली.

परिणीती शेवटची गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या 'अमर सिंह चमकिला' या चित्रपटात दिसली होती. तिच्या एकूण संपत्तीबद्दल नेहमीच चर्चा होते. ती चित्रपट आणि जाहिरातींमधून बक्कळ पैसे कमवते. जर तिच्या एकूण संपत्तीवर नजर टाकली तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती सुमारे ६० कोटी रुपये आहे.
 

Web Title: Parineeti Chopra Cut Rasgulla Instead Of Cake On Her Birthday In Childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.