'भागम भाग २'मध्ये गोविंदाच्या जागी मनोज वाजपेयी दिसणार, परेश रावल म्हणाले, "आम्हाला त्याची..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 10:34 IST2026-02-11T10:33:28+5:302026-02-11T10:34:40+5:30
२० वर्षांनंतर 'भागम भाग'चा सीक्वेल येणार

'भागम भाग २'मध्ये गोविंदाच्या जागी मनोज वाजपेयी दिसणार, परेश रावल म्हणाले, "आम्हाला त्याची..."
बॉलिवूडमधील विनोदी सिनेमांपैकी एक 'भागम भाग' सिनेमा आजही प्रेक्षकांनाही खळखळून हसवतो. २००६ साली सिनेमा प्रदर्शित झाला होता. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल ही तिकडी होती. तर लारा दत्ता मुख्य अभिनेत्री होती. आता २० वर्षांनी 'भागम भाग २' येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये गोविंदा मात्र दिसणार नाही असा खुलासा परेश रावल यांनी केला आहे. ते नक्की काय म्हणाले वाचा.
'हा' अभिनेता गोविंदाच्या जागी दिसणार
'भागम भाग २'मध्ये गोविंदाच्या जागी अभिनेते मनोज वाजपेयी भूमिका साकारणार अशी चर्चा होती. आता परेश रावल यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल म्हणाले, "हे खरंच एकदम भन्नाट कॉम्बिनेशन असेल'. तर गोविंदाबद्दल ते म्हणाले, 'मला याबद्दल खरंच कल्पना नाही. पण आम्हाला गोविंदाची नक्की आठवण येईल'. तसंच सिनेमात आपला डबल रोल असल्याचंही त्यांनी मुलाखतीत कन्फर्म केलं.
भागम भाग सिनेमाचा वेगळा चाहतावर्ग आहे. आजही सिनेमा टीव्हीवर लागला की प्रेक्षक आवर्जुन पाहतात. सिनेमाची कथा, त्यातला सस्पेन्स, परेश रावल-अक्षय आणि गोविंदाची कॉमेडी यामुळे सिनेमा ऑल टाईम हिट झाला. आता दुसऱ्या भागात गोविंदा दिसणार नसल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. तर मनोज वाजपेयी यांनी अक्षय आणि परेशसोबत कॉमेडी व्यक्तिरेखेत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.