धन्य ते पापाराझी! सख्ख्या भावासोबत आलेल्या रिया चक्रवर्तीला म्हणाले 'नाईस जोडी', अभिनेत्री भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 10:50 IST2024-01-16T10:41:05+5:302024-01-16T10:50:39+5:30

रिया चक्रवर्तीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

paparazi thought rhea chakraborty s brother showik as her boyfriend said nice jodi | धन्य ते पापाराझी! सख्ख्या भावासोबत आलेल्या रिया चक्रवर्तीला म्हणाले 'नाईस जोडी', अभिनेत्री भडकली

धन्य ते पापाराझी! सख्ख्या भावासोबत आलेल्या रिया चक्रवर्तीला म्हणाले 'नाईस जोडी', अभिनेत्री भडकली

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने 2020 साली गळफास घेत आत्महत्या केली.  यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) अनेक आरोप झाले. तिनेच सुशांतला ड्रग्स दिल्याने त्याच्यावर ही वेळ आली अशा पद्धतीचे ते आरोप होते. यानंतर रियाची पोलिस चौकशी, सीबीआय चौकशी आणि नंतर एनसीबी चौकशीही झाली. या चौकशीच्या कचाट्यात अडकलेल्या रियाला काही महिने तुरुंगातही घालवावे लागले. रियाचा सख्खा भाऊ शौविक चक्रवर्तीही (Showik Chakraborty) एनसीबीच्या कचाट्यात अडकला होता. त्यालाही तुरुंगवास भोगावा लागला. नुकतेच हे भाऊ बहीण आमिर खानची लेक आयरा खानच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचले. यावेळी पापाराझी दोघांना चुकून कपल समजले. यानंतर रियाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

सध्या रिया चक्रवर्तीबॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये हजर असते. नुकतंच तिने आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शन पार्टीतही हजेरी लावली. यावेळी तिने नेटची साडी नेसली होती. तर तिच्यासोबत तिचा सख्खा भाऊ शौविकही होता. दोघांनी एकत्रच कॅमेऱ्यासमोर पोज दिली.  तेव्हा एक कॅमेरामन चुकून त्यांना 'नाईस जोडी' असं म्हणाला. यानंतर रियाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. दुसऱ्या कॅमेरामनने 'अरे भाऊ बहीण आहेत' असं स्पष्टीकरण दिलं. यानंतर रिया म्हणाली,'अशाच लोकांमुळे अफवा पसरतात'.

रिया चक्रवर्ती सध्या बंटी सजदेहला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. सोहेल खानची एक्स वाईफ सीमा सजदेहचा तो भाऊ आहे. कॉर्नरस्टोन या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा तो सीईओ आहे. रिया गेल्या वर्षी एमटीव्ही रोडीजमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. लवकरच ती एका सिनेमातही दिसणार अशी चर्चा आहे.

Web Title: paparazi thought rhea chakraborty s brother showik as her boyfriend said nice jodi