सस्पेन्स, थ्रिलर, आणि एंटरटेंनमेंटचा धमाका...पंकज त्रिपाठीच्या 'कडक सिंह'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 05:46 PM2023-11-21T17:46:56+5:302023-11-21T17:50:51+5:30

पंकज त्रिपाठीच्या आगामी 'कडक सिंग' या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Pankaj Tripathi's 'Kadak Singh' trailer hits the screens | सस्पेन्स, थ्रिलर, आणि एंटरटेंनमेंटचा धमाका...पंकज त्रिपाठीच्या 'कडक सिंह'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सस्पेन्स, थ्रिलर! पंकज त्रिपाठीच्या 'कडक सिंह'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

‘मिर्झापूर’ फेम ‘कालिन भैया’ अर्थात अभिनेते म्हणून पंकज त्रिपाठी हे आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचा स्वतंत्र असा एक मोठा चाहतावर्ग आहे.  पंकज त्रिपाठीच्या आगामी 'कडक सिंग' या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.  चित्रपटात ए. के. श्रीवास्तव उर्फ कडक सिंग यांच्या आयुष्याची कहाणी दाखवली आहे. यात पंकज त्रिपाठी यांच्यासह पार्वती थिरुवोथु तसेच बांगलादेशी कलाकार जया अहसान ह्यांच्यासह संजना सांघी प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

नुकतेच सुपरस्टार अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड 2' या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची चुणूक पकंज त्रिपाठी यांनी दाखवली होती. पंकज त्रिपाठी प्रत्येक चित्रपटात आपल्या अभिनयाची छान छाप सोडतात. पंकज त्रिपाठीला चित्रपटात पाहायला चाहत्यांना आवडते, मग तो साइड रोलमध्ये असो किंवा मुख्य भूमिकेत, चाहत्यांना त्यांना चित्रपटात पाहायला आवडते.
 

Web Title: Pankaj Tripathi's 'Kadak Singh' trailer hits the screens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.