Pankaj Dheer: पंकज धीर अनंतात विलीन, गुणी अभिनेत्याला अखेरचा निरोप देताना संपूर्ण इंडस्ट्री भावूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 10:46 IST2025-10-16T10:45:38+5:302025-10-16T10:46:12+5:30
Pankaj Dheer Funeral: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने पंकज धीर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली.

Pankaj Dheer: पंकज धीर अनंतात विलीन, गुणी अभिनेत्याला अखेरचा निरोप देताना संपूर्ण इंडस्ट्री भावूक!
हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे बुधवारी (काल) वयाच्या ६८ व्या वर्षी कर्करोगामुळे (Cancer) निधन झाले. बी.आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या 'महाभारत' मालिकेतील त्यांची 'कर्ण' (Karna) या भुमिकेतून वेगळी छाप सोडली होती. त्यांच्या निधनाने हिंदी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार पंकज धीर यांचा मुलगा आणि अभिनेता निकितिनला धीर देण्यासाठी पोहचले. यावेळी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान यानेही अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली.
पंकज धीर यांच्या अंत्ययात्रेला जेव्हा सुरुवात झाली तेव्हाचेही व्हिडिओ समोर आले आहे. अंतिम यात्रेला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित राहून शेवटचा निरोप दिला. सलमानसह अंत्यसंस्कारात सिद्धार्थ मल्होत्रा देखील पोहचला होता. निकितिनसोबत अभिनेता कुशल टंडन पंकज धीर यांच्या मृतदेहाला खांदा देताना दिसला.
सलमान खान आणि पंकज धीर यांनी 'सनम बेवफा' आणि 'तुमको ना भूल पायेंगे' सारख्या यशस्वी सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. आपल्या जुन्या सहकलाकाराला अखेरचा निरोप देताना सलमान खान खूप भावुक झालेला दिसला. सलमान खानने निकितिन धीरची गळाभेट घेत त्याचे सांत्वन केलं. वडिलांच्या निधनानंतर निकितिन पार कोलमडून गेला होता.