लग्न मोडलं, आता पलाश मुच्छल सिनेमा दिग्दर्शित करणार; 'हा' मराठी अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 08:56 IST2026-01-20T08:55:14+5:302026-01-20T08:56:58+5:30

स्मृती मंधानासोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल आता दिग्दर्शक बनण्याकडे वाटचाल करतोय. एका मराठी अभिनेत्याची त्याला साथ मिळाली आहे. कोण आहे तो?

palash muchhal to become director for his upcoming movie actor shreyas talpade will be seen in a lead role | लग्न मोडलं, आता पलाश मुच्छल सिनेमा दिग्दर्शित करणार; 'हा' मराठी अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार

लग्न मोडलं, आता पलाश मुच्छल सिनेमा दिग्दर्शित करणार; 'हा' मराठी अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार

गेल्या वर्षात सर्वात चर्चेत राहिलेली बातमी म्हणजे भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न. त्यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. दुसरीकडे महिला संघाने वर्ल्ड कप जिंकल्याचाही आनंद होताच. मात्र या आनंदाच्या प्रसंगी विघ्न आलं आणि त्यांचं लग्न मोडलं. यामागचं कारण कोणालाच शेवटपर्यंत समजलं नाही. दरम्यान आता दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे जात आहेत. संगीतकार पलाश मुच्छल त्याचा पहिला सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. त्याच्या सिनेमात मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिका साकारणार आहे.

हा अभिनेता आहे सर्वांचा लाडका श्रेयस तळपदे. मराठीसह तो हिंदीतही प्रसिद्ध आहे. 'इमर्जन्सी' या कंगना राणौतच्या सिनेमात तो शेवटचा दिसला. अक्षय कुमारच्या 'वेलकम टू जंगल'मध्येही त्याची भूमिका असणार आहे. दरम्यान आता त्याने पलाश मुच्छलसोबत हातमिळवणी केली आहे. त्याच्या पहिल्याच दिग्दर्शित सिनेमात श्रेयस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिनेमाचं टायटल अद्याप निश्चित झालेलं नाही. सिनेमाची कहाणी मुंबईतली असणार आहे ज्यात श्रेयस एका सामान्य व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. पलाश मुच्छल दिग्दर्शित या सिनेमाचं शूट लवकरच सुरु होणार आहे.  चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत पलाशला चांगलंच ट्रोल केलं आहे. पलाशने कशाप्रकारे स्मृतीचा विश्वासघात केला हीच सिनेमाची कथा असेल का अशा भाषेत नेटकरी पलाशला सुनावत आहेत. 

पलाश हा बॉलिवूडमध्ये संगीतकार, गायक आहे. 'भूतनाथ रिटर्न्स'साठी त्याने संगीत दिलं आहे. याशिवाय आणखीही काही गाणी कंपोज केली आहे. आता तो दिग्दर्शकाच्या भूमिकेतून सर्वांसमोर येणार आहे.

Web Title : सगाई टूटी: पलाश मुच्छल निर्देशित फिल्म; श्रेयस तलपड़े मुख्य भूमिका में

Web Summary : सगाई टूटने के बाद, पलाश मुच्छल श्रेयस तलपड़े अभिनीत अपनी पहली फिल्म का निर्देशन करेंगे। फिल्म मुंबई में सेट है और तलपड़े को एक आम आदमी के रूप में दिखाती है। शूटिंग जल्द ही शुरू होगी। मुच्छल, एक बॉलीवुड संगीतकार, निर्देशन में कदम रख रहे हैं।

Web Title : Broken Engagement: Palash Muchhal Directs Film; Shreyas Talpade Leads

Web Summary : After a broken engagement, Palash Muchhal will direct his first film, starring Shreyas Talpade. The film is set in Mumbai and features Talpade as a common man. Shooting will commence soon. Muchhal, a Bollywood composer, ventures into directing.