स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:27 IST2025-12-01T12:25:50+5:302025-12-01T12:27:03+5:30
पलाश मुच्छल आईवडिलांसोबत विमानतळावर दिसला, कॅमेऱ्याकडे पाहून...

स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. स्मृतीच्या सांगली शहरात त्यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडणार होता. मेहंदी, संगीत हे फंक्शन्सही थाटात झाले. मात्र अचानक लग्न पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आली आणि सर्वांना आश्चर्य वाटलं. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे लग्न पोस्टपोन झाल्याचं कळलं. नंतर पलाशचीही तब्येत बिघडल्याचं समोर आलं. शेवटी पलाशने स्मृतीचा विश्वासघात केल्याची धक्कादायक बातमी समोर आली. आता या सगळ्या प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला आहे.
स्मृती मंधानासोबत लग्न पोस्टपोन झाल्यानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला. विमानतळावर तो आई वडिलांसोबत दिसला. ब्लॅक शर्ट, ग्रे पँट आणि ब्लॅक जॅकेट असा त्याचा लूक होता. तर त्याच्यासोबत मागे आईवडील चालत येत होते. त्याची आई हसत होती. कॅमेऱ्यासमोर पलाशनेही छोटी स्माईल दिली. त्याच्यासोबत काही सुरक्षारक्षकही होता. पलाशच्या चेहऱ्यावर दु:खी, नर्व्हस भाव स्पष्ट दिसत होते.
पलाश आणि स्मृतीचं लग्न कधी होणार याबद्दल अद्याप कोणीही माहिती दिलेली नाही. पलाशच्या आईने लग्न लवकरच होईल अशी प्रतिक्रिया दिली होती. या व्हिडीओवर 'अॅसिडिटी ठीक झाली का?','पलाश नॉटी बॉय' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा धक्का आल्याने लग्न पोस्टपोन करत असल्याची माहिती फॅमिलीने दिली होती. नंतर स्मृतीच्या कुटुंबाकडून अद्याप काहीही अपडेट आलेलं नाही.