Video: पाकिस्तानी कुटुंबाने 'धुरंधर २' पाहून केली टीका, स्पष्टच म्हणाले- "पहिल्या भागापेक्षा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:57 IST2026-03-23T13:55:45+5:302026-03-23T13:57:50+5:30

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी, एका व्हायरल व्हिडिओमुळे हा चित्रपट आणखी चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे,

pakistani family reacts after watching Dhurandhar 2 slam aditya dhar missed akshaye khanna | Video: पाकिस्तानी कुटुंबाने 'धुरंधर २' पाहून केली टीका, स्पष्टच म्हणाले- "पहिल्या भागापेक्षा..."

Video: पाकिस्तानी कुटुंबाने 'धुरंधर २' पाहून केली टीका, स्पष्टच म्हणाले- "पहिल्या भागापेक्षा..."

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी, एका व्हायरल व्हिडिओमुळे हा चित्रपट आणखी चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरील या व्हिडीओत एक कुटुंब चित्रपटगृहात 'मेजर इक्बाल'चं कौतुक करताना आणि 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसत आहे. पाकिस्तानी कुटुंबाने त्यांना 'धुरंधर २' कसा वाटला हेही सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ एका सिनेमागृहातील असून या संपूर्ण कुटुंबाने 'धुरंधर २' बघितला. या कुटुंबाला हा चित्रपट अजिबात आवडलेला नाही. व्हिडीओतील एका माणूस म्हणतो, ''थर्ड क्लास मूव्ही. आयुष्यात असा थर्ड क्लास मूव्ही पाहिला नाही.'', दुसरा एकजण म्हणतो, ''मेजर इक्बाल काय बोलला समजलं ना!'', दुसऱ्या एकाने पहिल्या भागाचं कौतुक केलं आहे, ''पहिला भाग खूप चांगला होता. हा भाग पहिल्या भागापेक्षा खूप वाईट आहे.'' त्यानंतर या कुटुंबाने ''मेजर इक्बाल जिंदाबाद''च्या घोषणा दिल्या. 




पुढे कुटुंबातील एका व्यक्तीने अक्षय खन्नाचं कौतुक केलं. ''आम्ही या भागात अक्षय खन्नाला मिस केलं. अक्षयने पहिला भाग त्याच्या अभिनयामुळे एका वेगळ्या उंचीवर पोहोचवला होता.'' पुढे या सर्वांनी ''पाकिस्तान जिंदाबाद''च्याही घोषणा दिल्या. अशाप्रकारे या पाकिस्तानी कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिली असून 'धुरंधर २'चा घाव तुम्हाला बरोबर लागला'', अशा कमेंट केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी या कुटुंबावर कारवाईची मागणीही केली आहे.
 
दुसरीकडे, चित्रपटाचे चाहते या व्हिडीओला केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट मानत आहेत. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' चित्रपटाबद्दल सांगायचं तर रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर.माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन या कलाकारांच्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. अवघ्या ४ दिवसांत 'धुरंधर २'ने ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Web Title : पाकिस्तानी परिवार ने 'धुरंधर 2' की आलोचना की, पहली फिल्म पसंद की।

Web Summary : पाकिस्तानी परिवार का 'धुरंधर 2' का वीडियो वायरल हुआ, जिसमें इसे पहली फिल्म से घटिया बताया गया और मेजर इकबाल की प्रशंसा की गई। उन्होंने अक्षय खन्ना के प्रदर्शन को याद किया। आलोचना के बावजूद, फिल्म ने चार दिनों में ₹500 करोड़ का आंकड़ा पार कर लिया।

Web Title : Pakistani Family Critiques 'Dhurandhar 2', Prefers First Film.

Web Summary : A Pakistani family's video review of 'Dhurandhar 2' went viral, criticizing it as inferior to the first film and praising Major Iqbal. They missed Akshay Khanna's performance. Despite criticism, the film crossed ₹500 crore in four days.