एकेकाळची इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री! तीन वेळा लग्न मोडल्याने मिळाला अपशकुनीचा टॅग; कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:44 IST2025-09-03T16:41:59+5:302025-09-03T16:44:39+5:30

एकेकाळची इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री! तीन वेळा लग्न मोडल्याने मिळाला अपशकुनीचा टॅग ; कॅन्सरने हरवलं पण...

pakistani actress rani begum filmy journey and real life story failure in marriage died because of cancer | एकेकाळची इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री! तीन वेळा लग्न मोडल्याने मिळाला अपशकुनीचा टॅग; कोण आहे 'ती'?

एकेकाळची इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री! तीन वेळा लग्न मोडल्याने मिळाला अपशकुनीचा टॅग; कोण आहे 'ती'?

Actress Rani Begum Filmy Journey: अभिनयाच्या चंदेरी दुनियेत नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून दररोज असंख्य तरुण-तरुणी स्वप्ननगरी मुंबईत येत असतात. काहींना यश मिळतं,तर काही अपयशी होऊन घरी परत जातात. १९६३ मध्ये महबूब या चित्रपटातून राणी बेगम या तरुणीने असेच आपले नशीब आजमावण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीच्या रुपेरी पडद्यावर आगमन केले. तुम्ही विचारात पडला असाल की कोण ही राणी बेगम? चला तर मग या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया...

आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे राणी बेगम. केवळ अभिनयासाठी नाही तर तिच्या सुंदर नृत्यामुळेही ही अभिनेत्री प्रेक्षकांची आवडती बनली. मात्र, या नायिकेच  वैयक्तिक आयुष्य फार कठीण  गेलं. राणी बेगम यांचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला.८ डिसेंबर १९४६ रोजी त्यांचा जन्म एका ड्रायव्हरच्या घरात झाला.या अभिनेत्रीचे वडील प्रसिद्ध पाकिस्तानी गायिका मुख्तार बेगम यांचे ड्रायव्हर होते.एके दिवशी, कुटुंबाची वाईट परिस्थिती पाहून, मुख्तार बेगमने राणीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनाही मुल नव्हतं.

या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य फारच चर्चेत राहिलं. राणी बेगम यांचं पहिलं लग्न दिग्दर्शक हसन तारिक यांच्यासोबत झालं होतं. त्यांना राबिया ही मुलगीही होती.पण, लग्नानंतर काहीच वर्षांतरानी बेगम मुलीसह वेगळ्या राहू लागल्या.पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर रानी बेगमच्या आयुष्यात निर्माता मिया जावेद यांची एन्ट्री झाली.त्यांनी पुन्हा संसार थाटण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांना कॅन्सर झाल्याचं समजताच पतीने त्यांची साथ सोडली. कॅन्सरच्या उपचारासाठी लंडनला गेल्यानंतर तिथे त्यांची भेट पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत झाली.त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं.पण, हे नातं देखील तुटलं. त्यानंतर पु्न्हा त्यांना कॅन्सरचं निदान झालं आणि त्यांचं निधन झालं. 

अपशकुनी म्हणून हिणवलं...

पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत राणीला अपशकुनीचा टॅग मिळाला. झालं असं की वयाच्या १६ व्या वर्षी तिला तिच्या आईमुळे चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अन्वर कमाल पाशा हे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट असायचा. पण राणी बेगमचा पहिला चित्रपट 'मेहबूब' सुपर फ्लॉप ठरला. त्यामुळे तिला अनेकांना अपशकुनी म्हणून हिणवलं.मात्र, ती स्वत:ला सिद्ध करत राहिली आणि काम करत राहिली. त्यानंतर राणी बेगमच्या मेहनतीचे फळ १९६६ मध्ये रिलीज झालेल्या 'देवर भाभी' या चित्रपटाने दिले. हा चित्रपट इतका मोठा ब्लॉकबस्टर ठरला की ती टॉपची अभिनेत्री बनली.

Web Title: pakistani actress rani begum filmy journey and real life story failure in marriage died because of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.