'आईचा हात धरुन...', माहिरा खानच्या दुसऱ्या लग्नात लेकाच्या डोळ्यात पाणी, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 12:43 IST2023-10-04T12:43:08+5:302023-10-04T12:43:32+5:30

तो आपल्या आईचा हात धरुन तिला तिच्या नवऱ्याकडे घेऊन जाताना दिसतोय.

Pakistani actress Mahira Khan wedding video her son seen taking her to aisle had tears in his eyes | 'आईचा हात धरुन...', माहिरा खानच्या दुसऱ्या लग्नात लेकाच्या डोळ्यात पाणी, Video व्हायरल

'आईचा हात धरुन...', माहिरा खानच्या दुसऱ्या लग्नात लेकाच्या डोळ्यात पाणी, Video व्हायरल

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'रईस' सिनेमातील पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेंड सलीम करीमसोबत माहिराचा दुसरा निकाह झाला आहे. या सोहळ्याचा सुंदर व्हिडिओ माहिराने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय. यामध्ये माहिराचा मुलगाही दिसत आहे ज्याला अश्रू अनावर झालेत. तो आपल्या आईचा हात धरुन तिला तिच्या नवऱ्याकडे घेऊन जाताना दिसतोय.

भरजरी पांढरा लेहंगा, डोक्यावर घुंगट आणि सुंदर नेकलेस असा माहिराचा लग्नात लुक होता. तर तिचा पती सलीम करीम गडद काळ्या सूटमध्ये दिसला. पाकिस्तानातीलच एका सुंदर ठिकाणी जवळच्या माणसांच्या साक्षीने दोघांनी लग्नगाठ बांधली. यावेळी माहिराचा मुलगा अझलान आईचा हात हातात धरुन तिला लग्नस्थळी घेऊन येताना दिसला. माहिराच्या या खास क्षणी तिच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. तर अझलानच्याही डोळ्यात पाणी आलं. माहिराच्या लग्नाचा हा भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

माहिरा खानबद्दल सांगायचं तर २००७ मध्ये अली अक्सारी सोबत तिचं लग्न झालं होतं. दोघंही अमेरिकेत भेटले होते. अली अक्सारी अभिनेता, निर्माता आहे. लग्नानंतर वयाच्या २४ व्या वर्षीच तिने मुलगा अजलानला जन्म दिला. मात्र काही कारणांमुळे २०१५ माहिरा आणि अलीचा त्यांचा घटस्फोट झाला. तर मुलाची कस्टडी माहिराला मिळाली. अनेक वर्षांनी माहिराला पुन्हा एकदा जोडीदार मिळाला आहे. सलीम करीम हा उद्योजक असून माहिरा आणि त्याची ओळख नक्की कुठे झाली हे समजू शकलेलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत होते. अखेर आता ते लग्नबंधनात अडकले आहेत.

 

Web Title: Pakistani actress Mahira Khan wedding video her son seen taking her to aisle had tears in his eyes