घटस्फोटानंतर एकटीनेच केला मुलाचा सांभाळ, शाहरुखची 'ही' अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्न करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 09:51 IST2023-08-18T09:50:23+5:302023-08-18T09:51:46+5:30

अभिनेत्रीचं नाव रणबीर कपूरसोबतही जोडलं गेलं होतं.

pakistani actress mahira khan seen with shahrukh khan in raees getting married again after divorce in 2015 | घटस्फोटानंतर एकटीनेच केला मुलाचा सांभाळ, शाहरुखची 'ही' अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्न करणार?

घटस्फोटानंतर एकटीनेच केला मुलाचा सांभाळ, शाहरुखची 'ही' अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्न करणार?

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) २०१७ साली आलेल्या 'रईस' सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने (Mahira Khan) भूमिका साकारली होती. माहिरा खान तशी बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे. रणबीर कपूरसोबतचे तिचे स्मोकिंग करतानाचे फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. माहिरा आता दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी तिचा घटस्फोट झाला असून आता ती दुसऱ्या लग्नाची तयारी करत आहे. पुढील महिन्यात बॉयफ्रेंड सलीम करीमसह ती लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

पाकिस्तानच्या माध्यम रिपोर्ट्सनुसार, माहिरा खान आणि सलीम करीम यांनी लग्नासाठी पाकिस्तानच्या पंजाबमधील एका हिल स्टेशनचा पर्याय निवडला आहे. त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी केवळ कुटुंबीय आणि मित्रपरिवार असे मोजकेच लोक सामील होणार आहेत. माहिरा आणि सलीम अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र अद्याप माहिराने अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही.

माहिराने तिचं नातं बऱ्याच काळापासून लपवून ठेवलं होतं. मात्र त्यांना काही इव्हेंट्समध्ये सोबत पाहिलं गेलं. सलीम एक प्रसिद्ध उद्योजक आहे. दोघांची भेट एका इव्हेंटमध्येच झाली होती. माहिराचं आधी २००७ मध्ये अली अस्करीसोबत पहिलं लग्न झालं होतं. २००९ साली तिने अजलान या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांच्यात खटके उडाले आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये ते विभक्त झाले. आता माहिराच्या दुसऱ्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

Web Title: pakistani actress mahira khan seen with shahrukh khan in raees getting married again after divorce in 2015