कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 11:25 IST2025-04-30T11:25:17+5:302025-04-30T11:25:43+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू करार मोडला. त्यामुळे पाकिस्तानचं पाणी बंद झालं. यामुळे एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या काळजीपोटी एका भारतीय चाहत्याने तिला थेट पाण्याचे बॉक्स पाठवले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (hania aamir)

कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
पहलगाम हल्ल्यानंतर (pahalgam attack) भारतानेपाकिस्तानचंपाणी बंद केलं. त्यानंतर पाकिस्तानी नागरीकांची चांगलीच भंबेरी उडालेली दिसली. अनेक भारतीयांनी या निर्णयाचं समर्थन केलंय. पण पाकिस्तानी नागरीकांना मात्र भविष्याची काळजी आहे. अशातच एका पाकिस्तानी अभिनेत्रीला पाणी मिळणार नाही, याची काळजी तिच्या भारतीय चाहत्याला पडली आहे. त्यामुळे या चाहत्याने पाण्याची बॉटल असणारा मोठा बॉक्सच या अभिनेत्रीला कुरिअर केलाय. जाणून घ्या ही खास स्टोरी.
भारतीय चाहत्याकडून पाकिस्तानी अभिनेत्रीला पाणी
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला (hania aamir) तिचा एक चाहता पाण्याचे बॉक्स पाठवताना दिसतो. हा बॉक्स कुरिअर करणारा मुलगा तो बॉक्स कॅमेरात दाखवतो. त्या बॉक्सवर लिहिलं असतं की, "हानिया आमिरसाठी...", याच बॉक्सवर रावळपिंडी, पंजाब, पाकिस्तानचा पत्ता लिहिला होता. 'भारताकडून हा पाण्याचा बॉक्स पाठवत आहे', असं खाली नमूद करण्यात आलं होतं. अशाप्रकारे पाकिस्तानी अभिनेत्रीसाठी तिच्या भारतीय चाहत्याने ही खास कृती केलेली दिसली.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. अनेकांनी भारतीय चाहत्याने केलेली ही कृती फक्त विनोदनिर्मितीसाठी केली, असं सांगितलं आहे. तर काहींनी भारतीय चाहत्याला त्याच्या आवडत्या पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याची खरंच काळजी आहे, असं सांगितलंय. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरबद्दल सांगायचं तर, पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देणारी ती पहिली पाकिस्तानी कलाकार होती. या हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यास सरकारने बंदी घातल्याने हानियाच्या हातून 'सरदार जी ३' हा सिनेमा गेला.