Video: फोटो काढताना रणवीरमुळे वैतागला ओरी; नवऱ्याकडे दुर्लक्ष करत दीपिकानं घातली समजूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 10:28 IST2024-03-04T10:20:00+5:302024-03-04T10:28:17+5:30

रणवीर सिंग - ओरी - दीपिका पादुकोणचा व्हिडीओ व्हायरल झालाय. असं काय घडलं की ओरी रणवीरवर चिडला?

orry annoyed on Ranveer singh while taking pictures with Deepika padukone video viral | Video: फोटो काढताना रणवीरमुळे वैतागला ओरी; नवऱ्याकडे दुर्लक्ष करत दीपिकानं घातली समजूत

Video: फोटो काढताना रणवीरमुळे वैतागला ओरी; नवऱ्याकडे दुर्लक्ष करत दीपिकानं घातली समजूत

अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. अनेकांनी प्री - वेडिंग सोहळ्यात धमाकेदार परफॉर्मन्सही दिले. अशातच या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत फोटो काढणाऱ्या रणवीर सिंगवर ओरी चिडलेला दिसला. नेमकं काय घडलं?

झालं असं की, अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंंगमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ओरी दीपिका पादुकोणसोबत फोटो क्लिक करताना दिसतोय. लवकरच आई होणाऱ्या दीपिका पादुकोणसोबत ओरी जबरदस्त पोज देताना दिसतो. दीपिकाचा नवरा म्हणजेच रणवीर सिंग कॅमेरात हे फोटो क्लिक करतोय. दीपिका शांतपणे उभी राहून ओरीसोबत पोज देत असल्याचे पाहायला मिळतं. पण ओरीला मात्र रणवीरने केलेली फोटोग्राफी आवडली नसल्याचं स्पष्ट दिसतंय.

 रणवीरने ओरी - दीपिकाचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले. ओरी सतत रणवीरला त्याला कसे फोटो हवेत याच्या सूचना देताना दिसला. रणवीर त्याच्या परिने चांगले फोटो काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण या व्हिडिओमध्ये ओरी रणवीरवर खुपच वैतागलेला दिसतो. एके ठिकाणी तो रणवीरच्या हातातून फोन घेण्याचा प्रयत्न करताना दिसला. शेवटी दीपिका ओरीची समजुत काढताना दिसली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय.

Web Title: orry annoyed on Ranveer singh while taking pictures with Deepika padukone video viral