"इथली लोकं, इथलं जेवण..." 'मिस वर्ल्ड २०२५' विजेती ओपल सुचाता भारताबद्दल काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:57 IST2025-06-01T17:57:34+5:302025-06-01T17:57:58+5:30

मिस वर्ल्ड २०२५'चा मुकुट जिंकल्यानंतर ओपल सुचातानं माध्यमांशी खास संवाद साधला. यावेळी भारताबद्दल ती काय म्हणाली, हे जाणून घेऊया.

Opal Suchata Chuangsri Crowned Miss World 2025 On India Says People And Food | "इथली लोकं, इथलं जेवण..." 'मिस वर्ल्ड २०२५' विजेती ओपल सुचाता भारताबद्दल काय म्हणाली?

"इथली लोकं, इथलं जेवण..." 'मिस वर्ल्ड २०२५' विजेती ओपल सुचाता भारताबद्दल काय म्हणाली?

Opal Suchata Chuangsri crowned Miss World 2025: 'मिस वर्ल्ड २०२५'चा महाअंतिम सोहळा भारतातील हैदराबाद येथे ३१ मे रोजी पार पडला. मनोरंजन जगतातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य कार्यक्रमात थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिने 'मिस वर्ल्ड २०२५'चा मुकुट जिंकला. गेल्या वर्षीची विश्वसुंदरी क्रिस्टिना पिस्झकोवाने ओपल सुचाता चुआंगसरीच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकूट चढवला. विजयानंतर ओपल सुचातानं माध्यमांशी खास संवाद साधला. यावेळी भारताबद्दल ती काय म्हणाली, हे जाणून घेऊया.

थायलंडच्या ओपल सुचातानं 'मिस वर्ल्ड २०२५' स्पर्धेच्या निमित्तानं भारतात काही दिवस घालवले. आता माध्यमांशी बोलताना तिनं भारताबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. ती म्हणाली, "मी माझ्या मैत्रिणींना सांगत होते की मला हे ठिकाण सोडून जायचं नाही. कारण इथली लोकं, इथलं जेवण आणि संपूर्ण वातावरण विलक्षण आहे. भारतात मला खूप आनंदाचे क्षण मिळाले आहेत आणि ते मी कायम स्मरणात ठेवणार आहे". तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही भारतीय चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं. 

दरम्यान, 'मिस वर्ल्ड २०२५' ही स्पर्धा थायलंडसाठी अत्यंत भावनिक ठरली आहे, कारण तब्बल ७२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा किताब त्या देशात गेला आहे. ओपल सुचाताचा जन्म २० सप्टेंबर २००३ रोजी थायलंडमधील फुकेत येथे झाला. ती थाई मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धेची विजेतीदेखील आहे. १६व्या वर्षी ओपल सुचाताच्या स्तनामध्ये एक गाठ आढळून आली होती. त्यानंतर तिची सर्जरी करण्यात आली. तेव्हापासून ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात जनजागृती करण्यासाठी Opal For Her हे विशेष कॅम्पेन ती चालवते.


भारताने विजेतेपद गमावले
'मिस वर्ल्ड २०२५'च्या स्पर्धेत एकूण ११० देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातील नंदिनी गुप्तानेदेखील  'मिस वर्ल्ड २०२५' मध्ये भाग घेतला होता. परंतू, नंदिनी अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.  'मिस वर्ल्ड' ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी एक आहे.  १९५१ पासून दरवर्षी आयोजित केली जाणारी 'मिस वर्ल्ड' स्पर्धा पुन्हा एकदा भारतात झाली. यंदाच्या यजमानपदासाठी भारताची निवड झाली होती.

Web Title: Opal Suchata Chuangsri Crowned Miss World 2025 On India Says People And Food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.