लूकमुळे झाली अनेकदा रिजेक्ट; 15 वर्षांनी मिळाला पहिला सुपरहिट सिनेमा, आज टॉपच्या अभिनेत्रींना देतीये टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 11:05 IST2024-05-20T11:04:34+5:302024-05-20T11:05:20+5:30

Bollywood actress: या अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केलं. परंतु, तिचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजला नाही.

once-rejected-because-of-her-looks-did-not-get-single-hit-for-15-years-then-gave-blockbuster-movie-at-box-office | लूकमुळे झाली अनेकदा रिजेक्ट; 15 वर्षांनी मिळाला पहिला सुपरहिट सिनेमा, आज टॉपच्या अभिनेत्रींना देतीये टक्कर

लूकमुळे झाली अनेकदा रिजेक्ट; 15 वर्षांनी मिळाला पहिला सुपरहिट सिनेमा, आज टॉपच्या अभिनेत्रींना देतीये टक्कर

कलाविश्वात आज असे अनेक कलाकार पाहायला मिळतात जे आऊटसाइडर आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही गॉडफादरच्या मदतीशिवाय त्यांनी इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. यात सध्या अशा एका अभिनेत्रीची चर्चा रंगलीये जिला जवळपास १५ वर्ष एकही हिट सिनेमा मिळालं नाही. परंतु, या १५ वर्षानंतर ती ज्या सिनेमात झळकली तो बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. इतकंच नाही तर या सिनेमाची जागतिक स्तरावरही चर्चा झाली. विशेष म्हणजे माझ्या दिसण्यामुळेच मला अनेक सिनेमांमधून रिजेक्ट करण्यात

सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीये ती अभिनेत्री अदा शर्मा हिची. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या अदाने वयाच्या १५ व्या वर्षी तिच्या करिअरची सुरुवात केली. २००८ मध्ये अदाला पहिला ब्रेक मिळाला. 1920 या सिनेमातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. परंतु, त्यानंतर ती फारशी कोणत्या सिनेमात झळकली नाही. सुरुवातीच्या काळात तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या दिसण्यामुळे अनेक सिनेमा गमावले असं सांगितलं होतं.

"मी दिसायला चांगली नाहीये किंवा माझे केस कुरळे आहेत यांसारखी कारण देत मला ऑडिशनमध्येच रिजेक्ट करायचे", असं अदा म्हणाली. विशेष म्हणजे अदाने काही सिनेमांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. मात्र, लीड म्हणून तिला एकही सिनेमा मिळाला नव्हता. अखेर द केरळ स्टोरी या सिनेमातून तिने पुन्हा एकदा दमदार पदार्पण केलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमाची निर्मिती २० कोटींमध्ये झाली होती. परंतु, हा सिनेना देशविदेशात इतका गाजला की त्याने वर्ल्ड वाइट ३०३ कोटी रुपयांची कमाई केली.

 दरम्यान, अदा लवकरच बस्तर या सिनेमात झळकणार आहे. त्यानंतर ती सनफ्लॉवर, द गेम ऑफ ग्राइड या सिनेमांमध्येही झळकणार असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे यापूर्वी तिने 'कमांडो', 'कमांडो 2', 'हार्ट अटॅक', 'चार्ली चॅपलीन 2', 'सन ऑफ सत्यमुर्ती' यांसारख्या कितीतरी सिनेमात ती झळकली आहे.

Web Title: once-rejected-because-of-her-looks-did-not-get-single-hit-for-15-years-then-gave-blockbuster-movie-at-box-office