धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर वरुण धवनने दाखवली नव्या ऑफिसची झलक, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 19:52 IST2023-11-10T19:50:53+5:302023-11-10T19:52:45+5:30
धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर वरुणने स्वत:च्या नव्या ऑफिसची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर वरुण धवनने दाखवली नव्या ऑफिसची झलक, म्हणाला...
वरुण धवन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा तो मुलगा आहे. वरुणने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अनेक चित्रपटांत तो मुख्य भूमिका साकारताना दिसला. बॉलिवूडमधील करिअरबरोबर वरुण वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. वरुणने वैयक्तिक आयुष्यात एक पाऊल पुढे ठेवलं आहे. धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर वरुणने स्वत:च्या नव्या ऑफिसची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
वरुण धवनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वरुण धवन त्याच्या चाहत्यांना ऑफिसची झलक दाखवत आहे. वरुण धवनने शाळा-कॉलेजमधील अभ्यासाचे प्रमाणपत्र, पदके आणि चित्रपटांसाठीचे पुरस्कार चाहत्यांना दाखवले. त्याच्या आलिशान घराप्रमाणेच ऑफिसही खूप आलिशान आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांंनी लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वरुणच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर तो शेवटचा नितेश तिवारी दिग्दर्शित "बवाल' चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तो एटली कुमार दिग्दर्शित 'व्हिडी 18' या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. हा चित्रपट 2024 ला रिलीज होणार आहे. एटली आणि वरुण धवन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. वरुणने नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. पण त्याला अभिनयात अधिक रस असल्याने तो बॉलिवूडकडे वळला.