OMG...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, साऊथ सिनेइंडस्ट्रीची केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 06:00 IST2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:00+5:30

या अभिनेत्रीने साऊथ सिनेइंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटविली आहे.

OMG ...! Shruti Haasan Has Raised Question Over Woman Safety And South Film Industry | OMG...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, साऊथ सिनेइंडस्ट्रीची केली पोलखोल

OMG...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, साऊथ सिनेइंडस्ट्रीची केली पोलखोल

अभिनेता कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन हिने दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीपासून बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवली आहे. ती जास्त सिनेमात झळकली नसली तरी तिचा फॅन फॉलोविंग खूप आहे. श्रुती अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही सहभाग घेताना दिसते. नुकताच तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिने या कार्यक्रमात सांगितलं की, बॉलिवूड इंडस्ट्रीसारखंच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतही स्त्री पुरूष असा भेदभाव केला जातो.


एका वाहिनीशी बोलताना श्रुती हसनने सांगितलं की, असं नाही आहे की फक्त बॉलिवूडमध्येच अभिनेत्रींना कमी मानधन मिळतं. तर दाक्षिणात्य सिनेमातही असंच चित्र आहे. तिथेदेखील अभिनेत्याना अभिनेत्रीपेक्षा जास्त मानधन व सुविधा मिळते. मला आशा आहे की आगामी काळात महिलांना समान वर्तणूक व मानधन मिळेल. 


एका कार्यक्रमात मीडियाशी बोलताना श्रुती म्हणाली की, महिलांच्या अधिकारांसाठी लोक रॅली काढतात व विरोध प्रदर्शन करतात. मला या गोष्टीचं वाईट वाटतं की समान हक्कासाठी व महिला सुरक्षिततेसाठी आजही आपल्याला रॅलीची गरज पडते. असं फार पूर्वीपासून होत आहे.


श्रुती पुढे म्हणाली की, मला वाटत नाही की असं फक्त आपल्या देशातच होतं. असं जगभरात होत असेल.

जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय बातम्या पाहतो तेव्हा आपल्याला समजतं की ही समस्या सगळीकडे आहे.

Web Title: OMG ...! Shruti Haasan Has Raised Question Over Woman Safety And South Film Industry