OMG! लग्नानंतर दीपिका पादुकोणने नाही रणवीर सिंगने बदलले नाव!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 15:01 IST2018-12-24T14:57:58+5:302018-12-24T15:01:08+5:30

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या लग्नाला महिना लोटून गेला. पण या लग्नाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. आता तर हे कपल आणखीच चर्चेत आले आहे. याला कारण आहे, दीपिकाचा लग्नानंतरचा पहिला इंटरव्ह्यू.

OMG! deepika padukone reveals to feeling of ranveer singh after marriage | OMG! लग्नानंतर दीपिका पादुकोणने नाही रणवीर सिंगने बदलले नाव!!

OMG! लग्नानंतर दीपिका पादुकोणने नाही रणवीर सिंगने बदलले नाव!!

ठळक मुद्देया मुलाखतीत लग्नावरही दीपिका बोलली. रणवीर माझ्या भांगात कुंकू भरत असताना मला ‘ओम शांती ओम’चा  ‘एक चुटकी सिंदूर’ हा डायलॉग आठवत होता, असे दीपिका यावेळी म्हणाली.

दीपिका पादुकोणरणवीर सिंग यांच्या लग्नाला महिना लोटून गेला. पण या लग्नाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. आता तर हे कपल आणखीच चर्चेत आले आहे. याला कारण आहे, दीपिकाचा लग्नानंतरचा पहिला इंटरव्ह्यू. होय, फिल्मफेअरला दीपिकाने लग्नानंतर पहिली मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान दीपिकाने दिलखुलास गप्पा मारल्या. लग्नानंतर तुला दीपिका पादुकोण असेच म्हणायचे की, दीपिका पादुकोण सिंग भवनानी, अशी तुझी ओळख करून द्यायची? असा प्रश्न डीपीला केला गेला. यावर दीपिकाने मोठे मजेशीर उत्तर दिले. मी आहे, दीपिका पादुकोण, वाईफ आॅफ रणवीर सिंग पादुकोण, असे दीपिका म्हणाली. यानंतर मुलाखतकर्त्याने याच शब्दांत दीपिकाची ओळख करून दिली.


या मुलाखतीत लग्नावरही दीपिका बोलली. रणवीर माझ्या भांगात कुंकू भरत असताना मला ‘ओम शांती ओम’चा  ‘एक चुटकी सिंदूर’ हा डायलॉग आठवत होता. मी अनेक लग्नाला गेले. पण स्वत:चे लग्न हा किती खास क्षण असतो, हे मला माझ्याच लग्नावेळी जाणवले, असे दीपिका यावेळी म्हणाली. मी अनेक वर्षे एकटी राहिली. पण आता रणवीर माझ्यासोबत आहे. रणवीर त्याच्या कामावर जातो आणि मी माझ्या. पण सकाळी आम्ही एकत्र उठतो. हे लग्नाची सर्वात खास बाब आहे, असेही तिने सांगितले. 
रणवीरसोबतच्या लव्हस्टोरीबद्दलही तिने खुलासा केला. मी रणवीरला अनेक अवॉर्ड इव्हेंटमध्ये भेटले होते. पण ‘रामलीला’च्या शूटींगवेळी आम्ही एकमेकांच्या जवळ आलोत. आम्हाला एकत्र आणण्यात संजय लीला भन्साळींचा सर्वात मोठा हात आहे, असे तिने सांगितले.

Web Title: OMG! deepika padukone reveals to feeling of ranveer singh after marriage