OMG! अक्षरा हासनच्या ‘फोटो लीक’ प्रकरणात समोर आले ‘या’ गाजलेल्या अभिनेत्रीच्या मुलाचे नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 15:38 IST2018-11-16T15:35:03+5:302018-11-16T15:38:37+5:30

कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन हिचे खासगी फोटो लीक झालेत आणि खळबळ माजली. या प्रकरणाला आता एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

OMG! Akshara Haasan Cyber Crime Case New Twist His Ex Boyfriend Tanuj Virwani, son of veteran actress Rati Agnihotri in Trouble | OMG! अक्षरा हासनच्या ‘फोटो लीक’ प्रकरणात समोर आले ‘या’ गाजलेल्या अभिनेत्रीच्या मुलाचे नाव!

OMG! अक्षरा हासनच्या ‘फोटो लीक’ प्रकरणात समोर आले ‘या’ गाजलेल्या अभिनेत्रीच्या मुलाचे नाव!

ठळक मुद्देक्षराने २०१३ मध्ये आपल्या आयफोन6 द्वारे हे फोटो घेतले होते आणि त्याचदरम्यान तनुजसोबत शेअर केले होते. २०१३ मध्ये अक्षरा व तनुज रिलेशनशिपमध्ये होते. मात्र २०१६ मध्ये दोघांचेही ब्रेकअप झाले होते.

कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन हिचे खासगी फोटो लीक झालेत आणि खळबळ माजली. या प्रकरणाला आता एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. होय, या प्रकरणात एकेकाळची गाजलेली अभिनेत्री रति अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवानी याचे नाव समोर आले आहे. होय, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षराने हे फोटो कधीकाळी तनुजसोबत शेअर केले होते. त्यामुळे आता या प्रकरणात लवकरच तनुजची चौकशी होऊ शकते.


प्राप्त माहितीनुसार, अक्षराने २०१३ मध्ये आपल्या आयफोन6 द्वारे हे फोटो घेतले होते आणि त्याचदरम्यान तनुजसोबत शेअर केले होते. २०१३ मध्ये अक्षरा व तनुज रिलेशनशिपमध्ये होते. मात्र २०१६ मध्ये दोघांचेही ब्रेकअप झाले होते. तथापि मुंबई मिररशी बोलताना माझ्याकडे अक्षराचे कुठलेही फोटो नाहीत, असे तनुजने म्हटले आहे.
तनुजने २०१३ मध्ये ‘लव यू सोनिया’द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे, तनुजची आई रति अग्निहोत्री हिने १९८१ मध्ये अक्षराचे वडील कमल हासन यांच्या ‘एक दुजे के लिए’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.
लीक झालेल्या या फोटोंत  अक्षरा हासन अंडरगारमेंटमध्ये दिसत असून सेल्फी घेताना दिसत आहे. हे फोटो अ‍ॅक्ट्रेस दीवाना नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले होते. या प्रकारानंतर अक्षराने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शिवाय यावर चुप्पी तोडत, हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. ‘अलीकडे माझे काही खासगी फोटो लीक झालेत. ज्याने कुणी हे केलेय, त्याला ना मी ओळखत, ना तो मला ओळखत. मला फक्त एक गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे एका तरूण मुलीसोबत असा प्रकार होणे अतिशय दुर्दैवी आहे. तुम्ही तुमच्या मजेसाठी कुणासोबत असला प्रकार करू शकत नाही. माझे फोटो लीक करणाºया व्यक्तिसोबतच, हे फोटो कॅची हेडलाईन्ससह प्रकाशित करणाºयांनीही एकप्रकारे माझे शोषणचं केले आहे. देशात मीटू मोहिम सुरू असताना एखाद्याची असे करण्याची हिंमत व्हावी, हेही दुर्दैवी आहे. मी यासंदर्भात मुंबई पोलिसांची मदत मागितली आहे. ज्याने कुणी हे केलेय, त्याचा शोध लवकरच लागेल, याचा मला विश्वास आहे,’असे अक्षराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

Web Title: OMG! Akshara Haasan Cyber Crime Case New Twist His Ex Boyfriend Tanuj Virwani, son of veteran actress Rati Agnihotri in Trouble