OMG 2: कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ, भगवान शंकराच्या अवतारात दिसला अक्षय कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 16:07 IST2023-07-03T15:53:00+5:302023-07-03T16:07:24+5:30
नवं पोस्टर पाहून यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.

OMG 2: कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ, भगवान शंकराच्या अवतारात दिसला अक्षय कुमार
अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर 'OMG' हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता या सुपर यशस्वी चित्रपटाच्या 11 वर्षांनंतर, अक्षय कुमार पुन्हा एकदा सोशल कॉमेडी 'OMG 2' सह रुपेरी पडद्यावर थिरकण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार भगवान कृष्णाच्या रुपात दाखवण्यात आला होता, तर 'OMG 2' मध्ये अक्षय कुमार भगवान शिवाच्या अवतारात दिसणार आहे. त्याचबरोबर या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे नवे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरवर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.
अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर OMG 2 मधील त्याचा नव्या लूकचे पोस्टर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काही दिवसात... 11 ऑगस्टला OMG सिनेमागृहात... लवकरच टीझर रिलीज होईल.'
दुसरे पोस्टर पंकज त्रिपाठीसोबत शेअर करण्यात आले आहे. पंकजने या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचा खुलासा केला आहे. OMG 2 मध्ये पंकज त्रिपाठी कांती शरण मुदगलच्या भूमिकेत दिसणार आहे.
अक्षय कुमार सोबत यामी गौतम दिसणार मुख्य भूमिकेत
OMG 2 मध्ये अक्षय कुमार सोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत. यावेळी हा चित्रपट शिक्षण व्यवस्थेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल शाह, राजेश शाह, अश्विन वर्दे आणि अक्षय कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित राय आहेत. OMG 2012 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार आणि परेश रावल मुख्य भूमिकेत होते.