अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ साठी शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले, “हा चित्रपट...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 12:26 IST2023-08-15T12:25:25+5:302023-08-15T12:26:23+5:30

OMG 2 : शरद पोंक्षेंनी अक्षय कुमारच्या 'ओएमजी २' चित्रपटासाठी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष

omg 2 marathi actor sharad ponkshe shared special post for akshay kumar bollywood movie | अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ साठी शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले, “हा चित्रपट...”

अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ साठी शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले, “हा चित्रपट...”

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित ‘ओएमजी २’(OMG2) चित्रपट ११ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘ओएमजी’(OMG) चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. तब्बल ११ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सीक्वेलसाठी प्रेक्षक आतुर होते. ‘ओएमजी २’(OMG2) या चित्रपटातून सेक्स एज्युकेशनसारख्या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. ‘ओएमजी’(OMG) प्रमाणेच ‘ओएमजी २’(OMG2) देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाचं सोशल मीडियावरही कौतुक होताना दिसत आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेता शरद पोंक्षे यांनाही अक्षयच्या ‘ओएमजी २’(OMG2) चित्रपटाने भुरळ घातली आहे. ‘ओएमजी २’(OMG2) सिनेमा पाहिल्यानंतर शरद पोक्षेंनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर खास पोस्ट लिहिली आहे. पोक्षेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘ओएमजी २’(OMG2) चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. “प्रत्येकानं अवश्य पहावा असा सिनेमा”, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. अक्षयचा ‘ओएमजी २’(OMG2) हा चित्रपट पाहण्याचं आवाहन पोंक्षेंनी त्यांच्या पोस्टमधून प्रेक्षकांना केलं आहे.

भांगडा अन् 'वंदे मातरम'च्या घोषणा! ऑस्ट्रेलियात भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन, मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, समोर आलं मोठं कारण

दरम्यान, अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’(OMG2) चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने सोमवारी(१४ ऑगस्ट) ११ते १२ कोटींची कमाई केली आहे. तर चार दिवसांत ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘ओएमजी २’(OMG2) चित्रपटात अक्षय कुमारबरोबर पंकज त्रिपाठी, यामी गौतम या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: omg 2 marathi actor sharad ponkshe shared special post for akshay kumar bollywood movie