अरे देवा! अथिया वापरते बॉयफ्रेंडचे कपडे; K.L.Rahul च्या टी-शर्टमधील 'ते' फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 17:47 IST2021-12-09T17:46:21+5:302021-12-09T17:47:24+5:30
Athiya Shetty: के.एल. राहुलच्या एका फॅनपेजवर या दोघांचे सेम कपडे असलेले फोटो शेअर करण्यात आले आहेत. यावरुन अनेकदा अथियाने राहुलचे कपडे परिधान केल्याचं दिसून येतं.

अरे देवा! अथिया वापरते बॉयफ्रेंडचे कपडे; K.L.Rahul च्या टी-शर्टमधील 'ते' फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty) आणि क्रिकेटपटू के.एल. राहुल (KL Rahul) यांचं नातं आता कोणापासूनही लपलेलं नाही. या दोघांनीही जाहीरपणे त्यांचं नातं मान्य केलं आहे. अनेकदा या जोडीला पब्लिक स्पेसमध्येही एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे ही जोडी कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. सध्या सोशल मीडियावर ही जोडी त्यांच्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. अथिया बॉयफ्रेंड के.एल. राहुलचे कपडे परिधान करत असल्याचं समोर आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच अथिया तिच्या भावाच्या अहान शेट्टीच्या (Ahan Shetty) आगामी तडप या सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत के.एल. राहुलदेखील होता. विशेष म्हणजे यावेळी तिने परिधान केलेलं जॅकेट के.एल. राहुलचं होतं. तेव्हापासून अथिया बऱ्याचदा तिच्या बॉयफ्रेंडचे कपडे परिधान करते याविषयी चर्चा सुरु झाली.
सध्या सोशल मीडियावर अथिया आणि के.एल. राहुलचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अथियाने अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडचे कपडे परिधान केल्याचं दिसून येत आहे. के.एल. राहुलच्या एका फॅनपेजवरही या दोघांचे सेम कपडे असलेले फोटो शेअर करण्यात आले आहेत.
दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अथियाने टायगर प्रिंट असलेलं के. एल. राहुलचं टी-शर्ट परिधान केल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये तिने राहुलचा पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातला आहे.