शेरास सव्वाशेर... लेक काजोलवर पडली भारी! वाचा नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 14:43 IST2023-11-10T14:41:11+5:302023-11-10T14:43:35+5:30
काजोलची लाडकी लेक निसा देवगण ही सोशल मीडियावरील लोकप्रिय सेलिब्रेटी आहे

शेरास सव्वाशेर... लेक काजोलवर पडली भारी! वाचा नेमकं काय घडलं
बॉलिवूडमधील काही स्टारकिड्स हे सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात. या स्टारकिड्समध्ये अजय देवगण आणि काजोल यांच्या लाडक्या लेकीचं नाव नेहमीच अग्रस्थानी असतं. कधी स्टारकिड्ससोबत डिनर पार्टी तर कधी गेट-टुगेदर.. निसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. यासाठी दुसरं-तिसरं कोणी नाही तर खुद्द निसाची आई अर्थात अभिनेत्री काजोल कारणीभूत आहे.
काजोलनं इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. काजोलनं पोस्टमध्ये निसासोबतचा किस्सा शेअर केला. यात काजोलने लिहलं, मी माझ्या मुलीला तिच्या अॅटिट्युडमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला. तर तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, ‘अॅटिट्युडच्या तक्रारींसाठी कृपया निर्मात्याशी संपर्क साधावा’. यावर काजोलनेही निसाच्या उत्तराचे कौतुक केले.
निसा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही याबद्दल अद्याप काजोल किंवा अजयने कोणतंही स्पष्ट मत मांडलं नाही. मात्र निसाला ज्या क्षेत्रात करिअर करायची आवड असेल त्या क्षेत्रात तिला करिअर करू देणार, असं अजयने एका मुलाखतीत म्हटलं होतं. तर काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, बराच काळ पडद्यापासून दूर राहिल्यानंतर काजोल पुन्हा एकदा 'द ट्रायल'मधून रुपेरी पडद्यावर परतली. अभिनेत्री दमदार कमबॅकचेही चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केले.