Nysa Devgan Video : अरेरे! अजय-काजोलची लेक पुन्हा धडपडली, व्हिडीओ पाहून लोकांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 17:42 IST2023-02-20T17:41:43+5:302023-02-20T17:42:36+5:30
Nysa Devgan Video : न्यासाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय आणि या व्हिडीओवरूनही न्यासाला ट्रोल केलं जातंय...

Nysa Devgan Video : अरेरे! अजय-काजोलची लेक पुन्हा धडपडली, व्हिडीओ पाहून लोकांनी केलं ट्रोल
अजय देवगण (Ajay Devgan) व काजोलची (Kajol) लेक न्यासा देवगणचा (Nysa Devgan) अद्याप बॉलिवूड डेब्यू झालेला नाही. पण सेलिब्रिटी किड असल्यामुळे कॅमेरे सतत तिच्यावर असतात. मित्रांसोबत पार्टी करतानाचे तिचे फोटो, व्हिडीओ सतत व्हायरल होतात. अगदी काही दिवसांपूर्वीच तिचा एक पार्टी व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आर्यन खान, सुहाना खान, शनाया कपूर, अनन्या पांडे आणि अन्य मित्रांसोबत मस्तपैकी पार्टी एन्जॉय केल्यानंतर न्यासा धडपडताना दिसली होती.
बाहेर पडत असताना रेस्टॉरंटंच्या दरवाज्यावरच ती धडपडते. तिचा तोल जातो. तिचा सुरक्षा रक्षक तिला सावरतो आणि गाडीपर्यंत पोहोचवतो, असा हा व्हिडीओ पाहून लोकांनी न्यासाला जबरदस्त ट्रोल केलं होतं. हा व्हिडीओ नंतर इंटरनेटवरून हटवण्यात आला. पण त्याचे काही स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले होते. ती दारूच्या नशेत आहे, अशा कमेंट अनेकांनी केल्या होत्या. अनेकांनी यानिमित्ताने अजय आणि काजोलवरही ताशेरे ओढले होते. यानंतर आता न्यासाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय आणि या व्हिडीओवरूनही न्यासाला ट्रोल केलं जातंय.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत न्यासा कारमधून खाली उतरताना दिसते. कारचा दरवाजा उघडताच न्यासा बाहेर पडते. मात्र तिचं डोकं कारच्या वरच्या भागाला आदळतं. अर्थात याऊपरही काही झालंच नाही, या तोऱ्यात ती कारमधून उतरून निघून जाते. हा व्हिडीओ पाहून नेहमीप्रमाणे नेटकरी तिला खूप ट्रोल करत आहेत. ‘ही नेहमी नशेतच असते’, ‘बिचारीला खूप जोरात लागलं’ अशा कमेंट युजर्सनी केल्या. काहींनी तिच्या मेकअपवरही कमेंट्स केल्यात., ‘ही मेकअपने अंघोळ करून येते की काय’, अशा शब्दांत काहींनी तिची खिल्ली उडवली.