'लग्नातला खर्च सुद्धा...'; नुसरत जहांने केली निखिल जैनची पोलखोल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 15:30 IST2021-11-12T15:30:00+5:302021-11-12T15:30:00+5:30
Nusrat jahan: अभिनेता यशदास गुप्ताला डेट करण्यापूर्वी नुसरतने व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्न केलं होतं. परंतु, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.

'लग्नातला खर्च सुद्धा...'; नुसरत जहांने केली निखिल जैनची पोलखोल?
लोकप्रिय बंगाली अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच नुसरत एका बाळाची आई झाली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या चर्चा काही गेल्या थांबायचं नाव घेत नाहीत. अभिनेता यशदास गुप्ताला डेट करण्यापूर्वी नुसरतने व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्न केलं होतं. परंतु, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. वैवाहिक जीवनात आलेल्या या चढउतारांनंतर नुसरतने आता निखिलवर काही आरोप केले आहेत. लग्नाच्यावेळी निखिलचं वागणं कसं होतं हे तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
'आजतक'च्या वृत्तानुसार, निखिलने नुसरतसोबत लग्न करताना एकही रुपया खर्च केला नव्हता. उलटपक्षी लाजेखातर नुसरतलाच हॉटेलचं बील भरावं लागलं होतं. "त्याने माझ्यासोबत लग्न करताना एक रुपयाही खर्च केला नव्हता. इतकंच काय तर साधं हॉटेलचं बील सुद्धा भरलं नव्हतं. मला त्याला काहीच सांगायची गरजच नाही. मी प्रामाणिक आहे. पण, माझ्याविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळेच आता मी हे स्पष्टीकरण देत आहे", असं नुसरत म्हणाली.
पुढे ती म्हणते," दुसऱ्यांना बदनाम करणं सोपं असतं.दुसऱ्यांविषयी चुकीच्या अफवा पसरवणंही सोपं असतं. पण या सगळ्या वादात मी कधीच कोणावर आरोप केले नाहीत."
दरम्यान, नुसरतने नाव न घेतला निखिल जैनवर टीकास्त्र डागलं.९ जून २०१९ मध्ये तिने व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्न केलं होतं. परंतु, नोव्हेंबरमध्ये ते लगेच विभक्त झाले. भारतीय कायद्यानुसार झालेलं त्यांचं लग्न तुर्कस्तानात अमान्य आहे, असं नुसरतने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितलं होतं. सध्या नुसरत अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असून त्यांना यिशान नावाचा एक लहानसा मुलगादेखील आहे.