बाबो..! नुसरत भरूचा रुपेरी पडद्यावर दिसणार कंडोम विकताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 19:28 IST2021-05-21T19:28:05+5:302021-05-21T19:28:42+5:30
अभिनेत्री नुसरत भरूचा 'जनहित में जारी' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

बाबो..! नुसरत भरूचा रुपेरी पडद्यावर दिसणार कंडोम विकताना
'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री नुसरत भरूचा आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आता ती जनहित में जारी या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंंगला सुरूवात होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसा, नुसरत भरूचा वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटात ती बबली गर्लची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नुसरतचा बोल्ड अंदाज पहायला मिळणार आहे.
जनहित जारी चित्रपटात नुसरत भरूचा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीचा रोल करणार आहे. नोकरीची गरज असल्याने तिला कंडोम बनवणाऱ्या कंपनीत 'सेल्स ऍन्ड प्रमोशन एक्झिक्युटिव्ह'चे काम करायला लागते. आपल्या कामाचा भाग म्हणून तिला मेडिकल स्टोअरपासून इतर अनेक ठिकाणी कंडोम विक्री करत हिंडावे लागते. अशा ठिकाणी तिला काय-काय अनुभव येतात, याचीच कॉमेडी कहाणी म्हणजे 'जनहित में जारी' असणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक राज शांडिल्य आणि नुसरत भरुचाने यापूर्वी 'ड्रीम गर्ल'साठीही एकत्र काम केले होते.
या सिनेमाच्या कथेची कल्पना जेव्हा राज शांडिल्यला सुचली, तेव्हा नुसरतने स्वतःहून हा रोल करण्याची तयारी दर्शवली. या नव्या भूमिकेत नुसरत भरूचा काय कमाल दाखवते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. त्यानंतर शेवटची ती छलांग सिनेमात झळकली.