सोनाली कुलकर्णीनंतर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुच्या अडकणार लग्नाच्या बेडीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 13:18 IST2020-05-19T13:03:50+5:302020-05-19T13:18:53+5:30
‘सोनू के टीटू की स्वीटी’ हा तिचा सिनेमा सुपरडुपर हिट झाला.

सोनाली कुलकर्णीनंतर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुच्या अडकणार लग्नाच्या बेडीत?
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुच्या आपल्या हॉट फोटोंना घेऊन चर्चेत असते. नुकताच तिने आपला 35 वा वाढदिवस साजरा केला आहे. राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार नुसरतच्या लग्नाबाबत तिच्या आईने एक इंटरेस्टिंग खुलासा केला आहे.
रिपोर्टनुसार नुसरतच्या आईने स्पष्ट केले की, ''लवकरच नुरसत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आम्ही नुसरत अजून आयुष्यात स्थिरावली नाही हे बघून चिंतेत येतो. लवकरच ती लग्न करणार आहे. आम्ही तिला लग्नासाठी तयार करु. आम्ही तिला आधीच खूपवेळ दिला आहे आता आणखी वेळ नाही देऊ शकत.''
नुसरतला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने. ‘किटी पार्टी’ या टीव्ही सीरिअलमध्ये तिला संधी मिळाली. 2002 मध्ये आलेल्या या मालिकेत बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लो मुख्य भूमिकेत होती. पण वर्षभरातच ही मालिका सोडण्याचा निर्णय तिने घेतला. कारण मोठा पडदा तिला खुणावत होता. हातची मालिका सोडून नुसरत चित्रपट मिळवण्यासाठी धडपडू लागली. ‘जय संतोषी मां’ हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाद्वारे नुसरतने बॉलिवूड डेब्यू तर केला पण तिचा हा डेब्यू सिनेमा सपाटून आपटला.
पहिलाच सिनेमा फ्लॉप झाल्याने नुसरतवर पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली. पुन्हा तोच संघर्ष वाट्याला आला. या संघर्षात 2009 हे साल उजाडले या वर्षात ‘कल किसने देखा है’ हा सिनेता तिला ऑफर झाला.‘प्यार का पंचनामा 2’ हा तिचा सिनेमा हिट झाला. यानंतर तीन वर्षांनी 2018 मध्ये तर नुसरतची जणू लॉटरी लागली. होय, या वर्षात आलेला ‘सोनू के टीटू की स्वीटी’ हा तिचा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. आयुषमान खुराणासोबत ‘ड्रिमगर्ल’मध्ये झकळली होती. तिचा हा सिनेमाही हिट झाला होता.