तर 'कबीर सिंग'मध्ये कियारा अडवाणीच्या जागी दिसली असती ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 19:49 IST2020-04-27T19:37:13+5:302020-04-27T19:49:30+5:30
कियाराच्या आधी ही भूमिका तिला ऑफर करण्यात आली होती.

तर 'कबीर सिंग'मध्ये कियारा अडवाणीच्या जागी दिसली असती ही अभिनेत्री
अभिनेत्री तारा सुतारिया 'स्टुडंट ऑफ द ईयर २' मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला . या सिनेमात ती टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेसोबत दिसली. याशिवाय ताराला कबीर सिंग सिनेमाची ऑफर देखील आली होती. कियाराच्या आधी ही भूमिका ताराला ऑफर करण्यात आली होती.
काही महिन्यांपूर्वी आलेल्या नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ज्यावेळी ताराला 'कबीर सिंग'ची ऑफर आली तेव्हा 'स्टुडंट ऑफ द ईयर २'चे बरेच शूटिंग बाकी होता म्हणून तिला 'कबीर सिंग' सोडावा लागला.. कबीर सिंग पहिला सिनेमा नाहीय ज्यासाठी ताराने नकार दिला तिने अलादीन सिनेमादेखील ट्रेनिंग घेतानामध्येच सोडून देऊन 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमासाठी भारतात परतली होती.
ताराची ‘आरएक्स 100’ सिनेमात वर्णी लागली आहे. ‘आरएक्स 100’ या तेलगू ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक आहे. यात सिनेमातून सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. दिग्दर्शन मिलन लुथरिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे तर सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे. ऐकूणच काय तर रिलीज आधीच अनेक मेकर्स ताराच्या प्रेमात पडले आहेत.