१ डिसेंबर नव्हे या दिवशी होणार दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांचे रिसेप्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:24 IST2018-11-12T14:18:37+5:302018-11-12T14:24:07+5:30
इटलीतून भारतात परतल्यानंतर बॉलिवूडमधील मित्रमंडळींसाठी दीपिका आणि रणवीर भव्य रिसेप्शन देणार आहेत. रणवीर आणि दीपिका यांचे रिसेप्शन १ डिसेंबरला होणार असल्याचे म्हटले जात होते.

१ डिसेंबर नव्हे या दिवशी होणार दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांचे रिसेप्शन
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग नुकतेच त्यांच्या लग्नासाठी इटलीला रवाना झाले आहेत. इटलीतील लेक कोमो या परिसरात त्या दोघांचे लग्न होणार आहे. या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी तिथे सध्या सुरू आहे. त्यांच्या लग्नाचा खास केक बनवण्यासाठी स्विर्झलँडवरून शेफना बोलवण्यात आले आहे. तसेच ते लग्नातील काही खास मिठाई देखील बनवणार आहेत.
इटलीतून भारतात परतल्यानंतर बॉलिवूडमधील मित्रमंडळींसाठी दीपिका आणि रणवीर भव्य रिसेप्शन देणार आहेत. रणवीर आणि दीपिका यांचे रिसेप्शन १ डिसेंबरला होणार असल्याचे म्हटले जात होते. पण त्यांचे मुंबईतील रिसेप्शन २८ नोव्हेंबरला होणार आहे. त्यांच्या रिसेप्शनचे कार्ड समोर आले असून त्यांचे रिसेप्शन हॉटेल ग्रँड हयातमध्ये रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. हे रिसेप्शन रणवीरच्या कुटुंबियांकडून असणार आहे. तसेच याआधी २१ नोव्हेंबरला रिसेप्शन पार्टी होणार आहे.
मुंबईतील रिसेप्शनला दीपिका आणि रणवीरचे बॉलिवूडमधील अनेक मित्रमैत्रिणी उपस्थिती लावणार आहेत. तसेच दीपिका बेंगळूरूमध्ये आपल्या नातेवाईकांसाठी रिसेप्शन देणार आहे.
बॉलिवूडचे सर्वाधिक रोमॅन्टिक कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. २१ आॅक्टोबरला दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती. तेव्हापासून दोघेही लग्नाच्या तयारीत बिझी आहेत. १४ नोव्हेंबरला दोघे साऊथ इंडियन पद्धतीने लग्न करणार आहेत. यानंतर १५ तारखेना नॉर्थ इंडियन पद्धतीने हे लग्न होणार आहे.
दीपिका आणि रणवीर यांचे लग्न जरी इटलीला होत असले तरी लग्नाच्या आधी करावयाचे अनेक विधी दीपिका आणि रणवीर यांनी भारतातच केले आहे. दीपिकाच्या बंगलूरुच्या घरी नुकतीच नंदी पूजा झाली तर रणवीरच्या घरी हळदीचा कार्यक्रम झाला.
रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला-रामलीला चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते. त्यानंतर त्या दोघांनी बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.