नोरा फतेहीचा अरेबिक 'दिलबर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 19:00 IST2018-10-02T18:57:02+5:302018-10-02T19:00:16+5:30
अभिनेत्री नोरा फतेही सध्या तिच्या 'दिलबर' गाण्याच्या अरेबिक स्टाईलमधील गाण्यावर काम करत असून लवकरच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नोरा फतेहीचा अरेबिक 'दिलबर'
अभिनेत्री नोरा फतेहीचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'सत्यमेव जयते' चित्रपटातील 'दिलबर…' हे गाणे चांगलेच गाजले. या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली होती. आता हे गाणे नव्या अंदाजात रसिकांना पाहायला मिळणार आहे. या गाण्याला अरेबिक तडका लागणार असून हे गाणे नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या नोरा या गाण्याच्या एडिटिंगमध्ये व्यग्र असून हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेता जॉन अब्राहमचा गेल्या महिन्यात १५ ऑगस्टला 'सत्यमेव जयते' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अभिनेत्री नोरा फतेहीवर 'दिलबर…' हे गाणे चित्रीत करण्यात आले होते. गाण्यातील बॅली डान्स आणि तिच्या अदा प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या होत्या. खरेतर हे गाणे 'सिर्फ तुम' या ९० च्या दशकातील चित्रपटात अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यावर चित्रीत झाले होते. नोराने गाण्याच्या रिक्रिएशनमध्ये नृत्याविष्कार दाखवला आहे. हे गाणे मध्य पूर्व आणि आफ्रिकी बँड, फनायर यांच्या सहकार्याने बनवण्यात आले आहे. तसेच दिलबर गाण्याला अरेबिक पद्धतीत बनवले जात आहे. या नवीन गाण्यासोबतच नोरा एक पॉपस्टारच्या रुपातही प्रेक्षकांच्यासमोर येत आहे.
नोरा फतेही तिच्या आगामी चित्रपटामुळेदेखील चर्चेत आहे. नोरा ही सलमान खानच्या भारत चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी ती स्पॅनिश भाषादेखील शिकत आहे. हा चित्रपट २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. नोराचे अरेबिक दिलबर गाणे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.