ब्लॅक बिकीनीमध्ये नोरा फतेहीच्या मादक अदा, फोटो पाहून फॅन्स झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 17:25 IST2022-02-02T17:23:59+5:302022-02-02T17:25:37+5:30

Nora Fatehi Bikini Pic : सध्या तिच्या स्वीमिंग पूलवरील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालता आहे. या फोटोतील नोराचा हॉट अंदाज पाहून फॅन्सची झोप उडाली आहे. 

Nora Fatehi shared black bikini photo goes viral on social media | ब्लॅक बिकीनीमध्ये नोरा फतेहीच्या मादक अदा, फोटो पाहून फॅन्स झाले फिदा

ब्लॅक बिकीनीमध्ये नोरा फतेहीच्या मादक अदा, फोटो पाहून फॅन्स झाले फिदा

आपल्या डान्स आणि अदांनी फॅन्सच्या हृदयात घर करणाऱ्या नोरा फतेही (Nora Fatehi) चा प्रत्येक अंदाज लोकांना आवडतो. ती सतत फॅन्ससाठी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तर कधी तिचे डान्स व्हिडीओ फॅन्सना अवाक् करतात. सध्या तिच्या स्वीमिंग पूलवरील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालता आहे. या फोटोतील नोराचा हॉट अंदाज पाहून फॅन्सची झोप उडाली आहे. 

नोराने पूलवरील हे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत. यात नोरा पूलच्या आत पाण्यात एन्जॉय करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत नोरा फोन बघताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नोरा काळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये हॉट लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण करण्यासाठी गोल्डन रंगाचे इयररिंग घातले आहेत. सोबत सटल मेकअपही केलं आहे.

बिकीनीतील हा फोटो नोराने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच फोटोच्या कॅप्शनला तिने लिहिलं की, ती तिच्यासोबत व्हेकेशन जॉइन करण्याची संधी देत आहे. नोराने लिहिलं की, 'मी पुढील व्हेकेशन प्लान करत आहे. कुणाला मला जॉइन करायचं आहे'.

याआधी नोराच्या सिंपल लूकने फॅन्सना भुरळ घातली होती. नोराने २६ जानेवारीला क्रीम कलरचा सूट घालून फोटो शेअर केले होते. अभिनेत्री या सिंपल लूकमध्ये इतकी सुंदर दिसत होती की, तिच्यावरून नजर हटक नव्हती.

नोरा फतेही सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससाठी सतत काहीना काही शेअर करत असते. ती जे शेअर करत त्याची चर्चाही होते. कधी आपल्या कपड्यांमुळे तर कधी डान्समुळे ती सतत चर्चेत असते. 
 

Web Title: Nora Fatehi shared black bikini photo goes viral on social media