एका राजकीय इव्हेंटमधील नोराचा थ्रोबॅक डान्स व्हिडीओ व्हायरल, 'दिलबर'गाण्यावर आणखी वेगळा अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 10:36 IST2020-12-15T10:34:39+5:302020-12-15T10:36:58+5:30

या व्हिडीओत अभिनेत्री नोरा फतेहीच्या मुव्ह्सचं यूजर्स भरभरून कौतुक करत आहेत. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर फॅन्स कमेंटवर कमेंट करत आहेत.

Nora Fatehi perform in white lehenga on dilbar song on stage throwback video viral | एका राजकीय इव्हेंटमधील नोराचा थ्रोबॅक डान्स व्हिडीओ व्हायरल, 'दिलबर'गाण्यावर आणखी वेगळा अंदाज...

एका राजकीय इव्हेंटमधील नोराचा थ्रोबॅक डान्स व्हिडीओ व्हायरल, 'दिलबर'गाण्यावर आणखी वेगळा अंदाज...

बॉलिवूडची फेमस डान्सर नोरा फतेही आपल्या डान्समुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर तर तिचे एकापेक्षा एक भारी डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तिचा असाच एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात ती एका पॉलिटिकल कार्यक्रमात स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. नोराचा हा व्हिडीओ तिच्या फॅन क्लबने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. 

या व्हिडीओत अभिनेत्री नोरा फतेहीच्या मुव्ह्सचं यूजर्स भरभरून कौतुक करत आहेत. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर फॅन्स कमेंटवर कमेंट करत आहेत. नोराच्या या व्हिडीओला आतापर्यंत ७६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओत ती एका राजकीय कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहे.

नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर ती लवकरच भुज - द प्राइड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील नोराच्या भूमिकेबाबतची एक क्लिप व्हायरल झाली होती. ज्यातील अभिनयाने नोराने सर्वांची मने जिंकली होती. 

नोरा काही दिवसांपूर्वी इंडियाज बेस्ट डान्सर या शोमध्ये जज म्हणूनही दिसली होती. या शोमध्ये नोरा फतेही काही दिवसांसाठी मलायका अरोराच्या जागी आली होती. त्यासोबतच नोरा फतेहीचं 'नाच मेरी राणी' हे गाणंही सुपरहिट ठरलं आहे. या गाण्याला यूट्यूबवर रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत.
 

Web Title: Nora Fatehi perform in white lehenga on dilbar song on stage throwback video viral