Nora Fatehi Video: नोरा फतेहीने अमेरिकेतील स्टेजवर केला जबरदस्त बेली डान्स, तूफान व्हायरल झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 06:50 PM2023-03-06T18:50:20+5:302023-03-06T18:51:18+5:30

नोराने जितकीही गाणी केली ती सगळी सुपरहिट झाली. दरम्यान नोराचा एक लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Nora fatehi belly dance video goes viral during akshay kumar the entertainers us tour | Nora Fatehi Video: नोरा फतेहीने अमेरिकेतील स्टेजवर केला जबरदस्त बेली डान्स, तूफान व्हायरल झाला व्हिडीओ

Nora Fatehi Video: नोरा फतेहीने अमेरिकेतील स्टेजवर केला जबरदस्त बेली डान्स, तूफान व्हायरल झाला व्हिडीओ

googlenewsNext

Nora Fatehi Belly Dance Video:  नोरा फतेही(Nora Fatehi) बॉलिवू़डमधील सर्वात चांगल्या डान्सर्सपैकी एक मानली जाते. अनेक टीव्ही शोज, म्युझिक व्हिडीओ आणि सिनेमात ती दिसते. नोराने जितकीही गाणी केली ती सगळी सुपरहिट झाली.  ज्यात 'मनोहरी', 'दिलबर', 'कमरिया', 'एक तो कम ज़िंदगानी', 'साकी-साकी', 'कुसू-कुसू' आणि 'हाय गर्मी' यांचा समावेश आहे.नोरा फतेहीचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही सुपरस्टार अक्षय कुमार(Akshay Kumar) च्या अमेरिकेतील एन्टरटेनर्स टूर दरम्यान स्टेजवर जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे.

नोरा फतेहीने केला बेली डान्स 
इन्स्टंट बॉलीवूडने अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नोरा फतेही लाल रंगाच्या शॉर्ट आणि स्टायलिश ड्रेसमध्ये स्टेजवर जबरदस्त डान्स करत आहे. खरं तर, या व्हिडिओमध्ये नोरा फतेही तिच्या सत्यमेव जयते 2 चित्रपटातील 'कुसु कुस' या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेहीच्या किलर डान्स मूव्ह्स पाहण्यासारख्या आहेत.

नोरा फतेहीचा हा व्हिडिओ बॉलिवूडचा पॉवरफुल अभिनेता अक्षय कुमारच्या नुकत्याच अमेरिकेत झालेल्या एंटरटेनर्स टूरचा आहे. नोरा फतेहीच्या या शानदार डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नोराच्या या व्हिडिओला चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.

नोरा फतेही (Nora Fatehi)  व्यतिरिक्त सुपरस्टार अक्षय कुमार(Akshay Kumar) च्या या अमेरिका दौऱ्यात इतर अनेक चित्रपट कलाकारही सहभागी झाले होते. यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय, सोनम बाजवा, दिशा पटानी आणि अपारशक्ती खुराना यांच्या नावाचा समावेश आहे. 

Web Title: Nora fatehi belly dance video goes viral during akshay kumar the entertainers us tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.