"मी त्यांना आधीच बजावलं होतं...",नोरा फतेहीचं गाणं लिहिणाऱ्या गीतकाराचा यूटर्न, म्हणाले-"निर्मात्यांनी मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:36 IST2026-03-18T09:35:46+5:302026-03-18T09:36:54+5:30
विचित्र स्टेप्स अश्लील शब्द! नोरा फतेहीच्या 'त्या' वादग्रस्त गाण्यावर गीतकाराने दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

"मी त्यांना आधीच बजावलं होतं...",नोरा फतेहीचं गाणं लिहिणाऱ्या गीतकाराचा यूटर्न, म्हणाले-"निर्मात्यांनी मला..."
Sarke Chunar Song Controversy: बॉलिवू़ड अभिनेत्री, नृ्त्यांगणा नोरा फतेही हिला कोणत्याची ओळखीची गरज नाही.नोरा आपल्या अनोख्या नृत्य कौशल्याने चाहत्यांना घायाळ करत असते.तिचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आजवर ती बॉलिवूडच्या अनेक गाण्यांमध्ये थिरकताना दिसून आली आहे. मात्र, सध्या नुकतंच एक प्रदर्शित झालेलं नारोचं गाणं तिच्या डोकेदुखीचं कारण बनलं आहे. या गाण्यामुळे नोरा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित केलेलं ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘केडी- द डेविल’ या कन्नड चित्रपटातील हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून त्यावर बरीच टीका होत आहे.
दरम्यान, या गाण्याचे बोल आणि त्यावरील कोरिओग्राफी अत्यंत अश्लील असल्याची टीका करण्यात येत आहे. अशातच ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्याचे गीतकार रकीब यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एचटी सिटीशी बोलताना, रकीब आलम यांनी 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणं त्यांनी लिहिलं नाही, असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. तो म्हणाला, "हे गाणे मी लिहलेले नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक, प्रेम यांनी हे गाणं मुळ कन्नड भाषेमध्ये लिहिलं होतं. जेव्हा त्यांनी मला हे गाणं लिहायला सांगितलं तेव्हाच मी नकार दिला. असे अश्लील शब्द गाण्यामध्ये चालणार नाहीत शिवाय सेन्सॉर त्यावर नक्कीच आक्षेप घेईल, असं मी त्यांना आधीच बजावलं होतं."
त्यानंतर मग ते म्हणाले, "त्यांनी मला फक्त कन्नड शब्दांचे शब्दशः हिंदीत भाषांतर करायला सांगितलं.ज्यामुळे ते एका चालीत बसवता येतील. मूळ कन्नड गाण्यामध्ये 'चूसेगा','चाटेगा'असे आक्षेपार्ह शब्द होते. गाण्याच्या शेवटी स्पष्ट होतं की संपूर्ण गाणं दारूच्या बाटलीबद्दल आहे. पण त्याआधीचं सगळं इतकं अश्लील आहे. मी हे गाणं लिहायला त्यांना नाही म्हटलं होतं. मला अशी गाणी लिहिण्याची काय गरज? जेव्हा मी चांगली गाणी लिहतो, तेव्हा कधी कोणी दखल घेतली नाही. मी राम चरणच्या आगामी 'पेड्डी' चित्रपटासाठी 'चिक्री चिक्री' हे हिंदी व्हर्जन असलेलं गाणं लिहिलं आहे. याशिवाय 'पुष्पा' चित्रपटातील सर्व हिंदी गाणी मी लिहिली आहेत.मात्र, 'सरके चुनर' गाण्यामुळे मला खरंच लाज वाटते."
रकीब पुढे म्हणाले,"त्यांनी मला सोमवारी रात्री फोन केला आणि चांगल्या शब्दांसह एक नवीन आवृत्ती लिहिण्याची विनंती केली. मी ती मंगळवारी सकाळी पाठवली आणि ते गाणं रेकॉर्डिंगही झालं आहे. लवकरच हे गाणं माफीनाम्यासह प्रदर्शित केलं जाईल." 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यामुळे नोरा फतेही आणि संजय दत्त टीकेचे धनी ठरले आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी हे गाणं यु्ट्यूबवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.