या अभिनेत्यानं वर्षात कमावले तब्बल ७०० कोटी, लो बजेट सिनेमांनीही जमवला चांगला गल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:41 IST2020-01-09T16:40:29+5:302020-01-09T16:41:01+5:30
'केसरी', 'मिशन मंगल', 'हाउसफुल 4' आणि 'गुड न्यूज' चारही सिनेमांनी मिळून ७०० रुपये कोटींची कमाई केली.

या अभिनेत्यानं वर्षात कमावले तब्बल ७०० कोटी, लो बजेट सिनेमांनीही जमवला चांगला गल्ला
'खिलाडियो को खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले होते.
विशेष म्हणजे अक्षय कुमारचे 4 ही सिनेमा सुपर हिट ठरले. 'केसरी', 'मिशन मंगल', 'हाउसफुल 4' आणि 'गुड न्यूज' चारही सिनेमांनी मिळून ७०० रुपये कोटींची कमाई केली. एका वर्षात 700 कोटी कमावणारा अक्षय कुमार पहिला अभिनेता ठरला आहे, त्याच्या कमी बजेटच्या सिनेमांनीही चांगली कमाई करण्यात यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षात अक्षयने आपलं मानधन दुप्पट केले असून प्रत्येक सिनेमासाठी तो तब्बल ५४ कोटी मानधन घेतो.
आपल्या कमाईचा बहुतांशी हिस्सा हा लष्काराच्या शूर जवानांसाठी दान करतो. इतकंच नाही तर विविध सामाजिक कार्यातही अक्कीचा पुढाकार असतो. शिवाय मोजक्या करदात्या सेलिब्रिटींमध्येही तो आघाडीवर असतो. आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे अक्षयने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.