आधी हॉटेल अन् नंतर फ्लाईटमध्ये Shubman Gill सोबत दिसली सारा; Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 13:40 IST2022-10-14T13:37:02+5:302022-10-14T13:40:46+5:30
भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल ( Shubman Gill) याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चर्चा कमावली होती.

आधी हॉटेल अन् नंतर फ्लाईटमध्ये Shubman Gill सोबत दिसली सारा; Video Viral
भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल ( Shubman Gill) याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चर्चा कमावली होती. आज तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि यावेळी सारा अली खान ( Sara Ali Khan) हिच्यामुळे ही चर्चा सुरू आहे. झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज दौऱ्यावर शुबमन प्लेअर ऑफ दी सीरिजा ठरला होता आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने चांगली कामगिरी केली.
करवाचौथच्या दिवशी शुबमन व सारा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात शुबमन व सारा हे विमानतळावर सोबत दिसले. शुबमन व सारा त्यांचं लगेज घेऊन जाताना दिसले आणि त्यानंतर सारा विमानात कॅबिन क्रू सदस्यांसोबत सेल्फी घेताना दिसी. शुबमन व सारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहे, परंतु याबाबत अद्याप दोघांपैकी कुणाकडूनही अधिकृत दुजोरा आलेला नाही.
लंडनमध्येही शुबमन व सारा सोबत दिसले होते. एका रेस्ट्रॉरंटमध्ये हे दोघं दिसली होती. याआधी शुबमनचं नाव महान फलंदाज सचिन तेंडुलकरची कन्या सारा हिच्याशी जोडलं गेलं होतं.
Sara Ali Khan and shubman gill spotted at airport together 👀pic.twitter.com/Ylv7NAQjc8
— Troll Cricket (@TrollCrickett) October 14, 2022
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"