अनुष्का-विराटचं दिव्यांग फॅनसोबतचं वर्तणूक पाहून भडकले नेटकरी, म्हणाले - प्रेमानंद जींकडे जाण्याचा काय फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:38 IST2025-12-17T11:26:26+5:302025-12-17T11:38:28+5:30
Anushka Sharma-Virat Kohli : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली जेव्हा प्रेमानंद जी महाराजांची भेट घेऊन मुंबईला परतले, तेव्हा एका दिव्यांग चाहत्याला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता. मात्र, अनुष्का आणि विराटने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, तर दुसरीकडे बॉडीगार्डने त्याला बाजूला सारले. हा व्हिडीओ पाहून युजर्सने संताप व्यक्त केला आहे.

अनुष्का-विराटचं दिव्यांग फॅनसोबतचं वर्तणूक पाहून भडकले नेटकरी, म्हणाले - प्रेमानंद जींकडे जाण्याचा काय फायदा?
अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नुकतीच पती विराट कोहली(Virat Kohli)सोबत वृंदावनला पोहोचली होती, तिथे त्यांनी कुंज आश्रमात प्रेमानंद जी महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. अनुष्का आणि विराट प्रेमानंद जी महाराजांना भेटण्याची ही तिसरी वेळ होती. पण आता एका कारणामुळे ते लोकांच्या निशाण्यावर आले असून त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. खरेतर, जेव्हा अनुष्का आणि विराट प्रेमानंद जी महाराजांना भेटून मुंबईला पोहोचले, तेव्हा विमानतळावर एक दिव्यांग चाहता कोहलीला फोटोसाठी विनंती करू लागला, पण विराट आणि अनुष्काने त्या चाहत्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
त्या दिव्यांग चाहत्याकडे अनुष्का आणि विराटने ढुंकूनही पाहिले नाही आणि ते आपल्या गाडीच्या दिशेने निघून गेले. तो चाहता मात्र त्यांच्याकडे पाहतच राहिला. अनुष्का आणि विराटची ही वृत्ती युजर्सना आवडलेली नाही आणि त्यांनी या जोडप्यावर जोरदार टीका केली आहे. "प्रेमानंद जी महाराजांकडे जाऊन काय फायदा, जर तुमचे वागणे असेच असेल तर?" असा सवाल लोक विचारत आहेत.
अनुष्का-विराटचे वर्तन पाहून युजर्स भडकले
अनुष्का आणि विराटचा प्रेमानंद जी महाराजांसोबतच्या भेटीच्या व्हिडीओशिवाय, या चाहत्यासोबतचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. यावर युजर्सनी निगेटिव्ह प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, "आध्यात्मिक सहलीला जाता, पण दिव्यांग चाहत्यांशी उद्धटपणे वागता." दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, "अत्यंत घृणास्पद वागणूक. अध्यात्म आणि नम्रतेचे हेच स्वरूप आहे का?"
''अहंकार अजूनही कायम''
आणखी एका युजरने म्हटले, "प्रेमानंद जींचे दर्शन घेऊन काय उपयोग, जर तिथून परतल्यानंतरही एखाद्याच्या मनात एवढा अहंकार आणि गर्व असेल? एक दिव्यांग मुलगा जो फक्त फोटो काढू इच्छित होता, त्याला दुर्लक्षित करणे हृदयद्रावक आहे. मला त्या मुलाबद्दल खूप वाईट वाटतेय." तर एकाने लिहिले, "विराटने हे चांगले केले नाही, खूप वाईट वागणूक." आणखी एकाने प्रश्न विचारला, "त्या मुलाला दुर्लक्षित का केले? किमान हाय-हॅलो तरी म्हणू शकले असते? आपल्या व्यग्र वेळापत्रकातून काही सेकंद काढता आले असते. त्यांनी मुलांच्या भावनांचा आदर करायला हवा."
लंडनवरून भारतात नुकतेच परतले विरुष्का
अनुष्का आणि विराट नुकतेच लंडनवरून भारतात परतले आहेत. भारतात आल्यानंतर ते थेट प्रेमानंद जी महाराजांच्या आश्रमात पोहोचले. तिथे दोघेही महाराजांसमोर गुडघ्यावर बसून त्यांचे प्रवचन ऐकत होते. त्यानंतर त्यांनी आशीर्वाद आणि दीक्षाही घेतली. यावेळी विराट आणि अनुष्काने गळ्यात तुळशीची माळ घातली होती.