Orry : ओरीनं थेट 9 ते 5 Job करणाऱ्यांची उडवली खिल्ली, नेमकं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:25 IST2024-07-29T12:24:21+5:302024-07-29T12:25:07+5:30

गेल्या काही दिवसांपासून ओरी हा तूफान चर्चेत आहे.

Netizens slam Orhan Awatramani's 9 to 5 jobs New Hairstyle | Orry : ओरीनं थेट 9 ते 5 Job करणाऱ्यांची उडवली खिल्ली, नेमकं काय म्हणाला?

Orry : ओरीनं थेट 9 ते 5 Job करणाऱ्यांची उडवली खिल्ली, नेमकं काय म्हणाला?

गेल्या काही दिवसांपासून ओरी (Orry) हा तूफान चर्चेत आहे. ओरहान अवत्रामणी म्हणजे ओरी हा प्रत्येक बाॅलिवूड पार्टीमध्ये दिसतो.  ओरी आणि बाॅलिवूड अभिनेत्रींचे फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होताना दिसतात. ओरी हा आपल्या अतरंगी फॅशन स्टाईलसाठीदेखील प्रसिद्ध आहे. नुकतेच त्यानं एक नवीन हेअरस्टाइल केली आहे. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत ओरीनं थेट 9 ते 5 Job करणाऱ्यांची खिल्ली उडवली आहे. यावरुन त्याच्या मोठी टीका केली जात आहे. 

ओरीने त्याच्या नवीन हेअरस्टाइलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटोंसोबत त्याने जे कॅप्शनमध्ये लिहलं, त्यामुळे 9 ते 5 Job करणाऱ्यांच्या  भावना दुखावल्या आहेत. ओरीनं कॅप्शनमध्ये लिहलं, "मी रोज संध्याकाळी चेहऱ्यावर हास्य घेऊन उठतो. यात मला काहीच वावगं वाटत नाही. तुम्ही कदाचित अजूनही ९ ते ५ या वेळेत काम करत आहात. मला तर वाटते यावेळेत काम करणं किती वाईट आहे". त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत त्याला चांगलेच सुनावले आहे. 


ओरीबद्दल बोलायचं झाल्यास, चो असा तसा कोणी नसून कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.  ओरीने मुंबई,तामिळनाडू, न्यूयॉर्क, लंडन आणि कॅनडा या ठिकाणी उच्चशिक्षण घेतलं आहे. विशेष म्हणजे ओरी याच्या अनेक मोठ्या कंपन्या आहेत. ओरीचे वडील अनेक कंपन्यांचे सीईओ आहेत. फक्त हेच नाही तर अंबानी यांच्या कंपनीमध्ये ओरीच्या कंपनीचे खूप जास्त शेअर असल्याची देखील माहिती मिळत आहे. ओरी टॉम फोर्ड, व्हिजन ऑफ सुपर आणि प्राडा यांसारख्या काही मोठ्या ब्रँडशी देखील जोडला आहे. ओरी केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही ओळखला जातो.

Web Title: Netizens slam Orhan Awatramani's 9 to 5 jobs New Hairstyle