Alia Bhatt Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलिया आली अन् ट्रोल झाली, युजर्स म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 05:19 PM2023-02-13T17:19:57+5:302023-02-13T17:23:01+5:30

 Kiara Advani & Sidharth Malhotra’s Wedding Reception, Alia Bhatt Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये एंट्री करतानाचा आलियाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.  

Netizens Criticise alia bhatt in Kiara Advani & Sidharth Malhotra’s Wedding Reception | Alia Bhatt Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलिया आली अन् ट्रोल झाली, युजर्स म्हणाले...

Alia Bhatt Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलिया आली अन् ट्रोल झाली, युजर्स म्हणाले...

googlenewsNext

 Kiara Advani & Sidharth Malhotra’s Wedding Reception : सिद्धार्थ मल्होत्राने गेल्या ७ फेब्रुवारीला कियारा अडवाणीसोबत लग्नगाठ बांधली. जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय व अगदी माेजके मित्रमंडळी हजर होते. लग्नानंतर काल मुंबईत कपलने आपल्या बॉलिवूड मित्रांसाठी ग्रॅण्ड रिसेप्शन दिलं. या रिसेप्शनचा थाटही बघण्यासारखा होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात रिसेप्शन पार्टी रंगली. या पार्टीचे एक ना अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहे. यातल्याच एका व्हिडीओची सध्या जाम चर्चा आहे. कारणही खास आहे. हा व्हिडीओ रिसेप्शन पार्टीत आलेल्या आलिया भटचा (Alia Bhatt) आहे.

कधी काळी आलिया भटसिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशिपमध्ये होते. कालांतराने दोघांचं ब्रेकअप झालं. पण झालं गेलं सगळं विसरून आलियाने सिद्धार्थच्या वेडींग रिसेप्शनला हजेरी लावली. आलिया आपल्या एक्सच्या रिसेप्शनला आली म्हटल्यावर चर्चा तर होणारच. चर्चा झाली पण एका वेगळ्या कारणासाठी. होय, रिसेप्शन पार्टीत आलिया आली खरी पण ती पुरती हरवलेली दिसली. सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये एंट्री करतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आलियाला ट्रोल करायला सुरूवात केली.  

आलियाने एकटीनेच पार्टीत एन्ट्री घेतली. शिमरी साडीत आलिया कमालीची सुंदर दिसत होती. पण पती रणबीर कपूर तिच्यासोबत नव्हता. आलियाने सुरुवातीला एकटीनेच मीडियाला पोझ दिल्या. मात्र नंतर सासू नीतू कपूरसोबत ती पोज देताना दिसली.

आलियाच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्यात. “ती किती हरवलेली, उदास दिसतेय. तिचे डोळे पाहून लक्षात येतं की तिच्याबरोबर काहीतरी चुकीचं झालं किंवा ती सिद्धार्थ कियारामुळे दुःखी आहे,” अशी कमेंट एका युजरने केली.  “कदाचित आलियाला या पार्टीत यायचंच नव्हतं. जणू ती बळजबरीने आली. ती पूर्णपणे हरवल्यासारखी दिसतेय. चेहराही विचित्र आहे”, असं अन्य एका युजरने लिहिलं.  “अरे रणबीर कुठाय,”असा सवाल एका युजरने केला. दु:खी डोळे, दु:खी चेहरा..., अशी कमेंट एका युजरने केली.

आलिया व सिद्धार्थ दाेघांनी ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. याच चित्रपटानंतर दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली होती. आलिया व सिद्धार्थने कधीच जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं. पण कालांतराने दोघांचं ब्रेकअप झालं. सिद्धार्थशी ब्रेकअप झाल्यावर आलिया रणबीर कपूरमध्ये गुंतली आणि सिद्धार्थला कियारा भेटली.  

Web Title: Netizens Criticise alia bhatt in Kiara Advani & Sidharth Malhotra’s Wedding Reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.