'या' बॉलिवूड चित्रपटात आहेत 30 किसिंग सिन, अभिनेत्रीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:19 IST2025-01-02T15:19:40+5:302025-01-02T15:19:57+5:30

अभिनेत्रीने एका चित्रपटात चक्क 30 किसिंग सिन दिले होते.

Neil Nitin Mukesh and Sonal Chauhan 3g A Killer Connection Is Bollywood Film With Most Kissing Scenes Had 30 Lip Locks | 'या' बॉलिवूड चित्रपटात आहेत 30 किसिंग सिन, अभिनेत्रीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा!

'या' बॉलिवूड चित्रपटात आहेत 30 किसिंग सिन, अभिनेत्रीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा!

3G A killer Connection: बोल्ड सीन, किसिंग हे आजच्या चित्रपटात सर्रास पाहायला मिळतं. रसिकांनाही यांत काहीही वावगं वाटत नाही. बोल्ड सीन आणि किसिंग सीनशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. बॉलिवूड चित्रपटांमध्ये किसिंग सिन असणे सामान्य आहे. अनेकवेळा चित्रपट हिट करण्यासाठी निर्माते चित्रपटांमध्ये बरेच बोल्ड आणि किसिंग सिनचा समावेश करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक बॉलिवूड चित्रपट आहे, ज्याच्या नावे सर्वाधिक किसिंग सीन देण्याचा विक्रम आहे. तर तो कोणता सिनेमा आहे, हे जाणून घेऊया. 

'3G A Killer Connection' असं या सिनेमाचं नाव आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) आणि सोनल चौहान (Sonal Chauhan) यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटात 30 हून अधिक लिपलॉक सीन्सचा समावेश करण्यात आला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन शीर्ष आनंद आणि शंतनू रे छिब्बर यांनी केलं होतं. 


'3G A Killer Connection' या चित्रपटाने किसिंग सीन देण्याचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. इमरान हाश्मीचा 'मर्डर' आणि बिपाशा बसूचा 'जिस्म' सिनेमालाही या चित्रपटाने मागे सोडलं होतं.   पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर केवळ 5.9 कोटी रुपयांची कमाई केली आणि निर्मात्यांसाठी तो खूप मोठा तोटा ठरला. या चित्रपटाला IMDb वर 3.6 रेटिंग मिळाले आहे. हा सिनेमा ट्यूबवर उपलब्ध आहे. तसेच ॲपल टीव्हीवर हा चित्रपट पाहता येईल.
 

Web Title: Neil Nitin Mukesh and Sonal Chauhan 3g A Killer Connection Is Bollywood Film With Most Kissing Scenes Had 30 Lip Locks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.