'कपडे घालण्याचे स्वातंत्र्य...', झूम करुन फोटो काढणाऱ्या पापाराझींना अभिनेत्री नेहा शर्मानं फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 11:14 IST2024-06-06T11:12:52+5:302024-06-06T11:14:02+5:30

गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत ‘पापाराझी कल्चर’ मोठ्या प्रमाणावर वाढलंय.

Neha Sharma expresses her disappointment over being photographed from inappropriate angles by the paparazzi | 'कपडे घालण्याचे स्वातंत्र्य...', झूम करुन फोटो काढणाऱ्या पापाराझींना अभिनेत्री नेहा शर्मानं फटकारलं

'कपडे घालण्याचे स्वातंत्र्य...', झूम करुन फोटो काढणाऱ्या पापाराझींना अभिनेत्री नेहा शर्मानं फटकारलं

गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत ‘पापाराझी कल्चर’ मोठ्या प्रमाणावर वाढलंय. सेलिब्रिटी कुठेही गेले तरी त्यांच्या मागे हे पापाराझी असतातच. सोशल मीडियावर आपण अभिनेत्रींचे असे अनेक व्हिडीओ पाहतो, ज्यामध्ये जाणूनबुजून त्यांना झूम-इन करून चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं.  अनेक अभिनेत्रींनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये पापाराझी त्यांच्या शरीराचे अवयव झूम करण्याचा प्रयत्न करतात अशी तक्रार केली आहे. अशाच पापाराझी अकाऊंट्स आणि फोटोग्राफर्सची चांगलीच शाळा अभिनेत्री नेहा शर्मा हिनं घेतली आहे. 

नेहा शर्मा ही नेहमीच पापाराझीं सोबत खेळीमेळीने राहते. मात्र यावेळी तिने त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. पापाराझी शरीरावर विनाकारण कॅमेरा झूम करतात अशी तिची तक्रार आहे. इंडिया टुडेशी संवाद साधताना नेहा म्हणाली, 'एक वेळ अशी असते जेव्हा लोकांनी तुम्हाला पाहू नये असे तुम्हाला वाटतं आणि त्यासाठी तुम्ही ब्रेक घेता.  जेव्हा तुमचे फोटो अनावश्यक अँगल्सने क्लिक केले जातात, तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य गमावता'.

अभिनेत्री या बाबतीत अजिबात कम्फर्टेबल नसल्याचं नेहा शर्मा हिनं सांगितलं. यासोबतच फोटो आणि व्हिडीओ क्लिक करुनचं कॅमेरा पर्सनचं घर चालतं, ते लोक कडक उन्हात मेहनत करतात, याची जाणीव असल्याचंही नेहा म्हणाली. नेहा शर्मा हिच्या आधी अभिनेत्री मृणाल ठाकूर, नोरा फतेही, जान्हवी कपूर यांनीदेखील पापाराझींवर नाराजी व्यक्त केली होती. 

नेहा शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलीकडेच कोर्टरूम ड्रामा 'Illegal 3' मध्ये दिसली. या सीरिजचे दिग्दर्शन साहिर रझा यांनी केलं आहे. यात अक्षय ओबेरॉयसह कुब्ब्रा सैत, आशिमा वरदान, इरा दुबे यांच्या भूमिका आहेत. सध्या नेहातिच्या आगामी सस्पेन्स थ्रिलर '36 डेज' च्या रिलीजची तयारी करत आहे.

Web Title: Neha Sharma expresses her disappointment over being photographed from inappropriate angles by the paparazzi