लग्नानंतर पहिल्यांदाच नेहा कक्करने साजरा केला होळी सण, स्विमिंग पूलमधील डान्स व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 19:28 IST2021-03-26T19:27:50+5:302021-03-26T19:28:14+5:30
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करची लग्नानंतरची पहिला होळी सण आहे आणि तिने नवरा रोहनप्रीत सिंगसोबत प्री होळी सेलिब्रेट करते आहे.

लग्नानंतर पहिल्यांदाच नेहा कक्करने साजरा केला होळी सण, स्विमिंग पूलमधील डान्स व्हायरल
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करची लग्नानंतरची पहिला होळी सण आहे आणि तिने नवरा रोहनप्रीत सिंगसोबत प्री होळी सेलिब्रेट केली आहे. तिने फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत पूल पार्टी करून होळी सेलिब्रेशनला सुरूवात केली आहे. नेहाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नेहा नवरा रोहनप्रीत सोबत स्विमिंग पूलमध्ये दिसली. यावेळी त्या दोघांचे फॅमिली आणि फ्रेंड्सदेखील होते.
नेहा कक्करने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नुकताच व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नेहा आणि रोहनप्रीतची केमिस्ट्री पहायला मिळाली. नेहाचे संपूर्ण कुटुंब प्री होळी साजरी करताना दिसत आहे. व्हिडीओत लहानांपासून मोठ्यांनी देखील गाण्यांवर ताल धरला आहे.
नेहाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'मारू पिचकारी होके लेफ्ट, होके राइट...' असे लिहिले आहे. लग्नानंतर नेहाची पहिली होळी असल्यामुळे ती अत्यंत आनंदी दिसते आहे. नेहा तिची पहिली होळी ऋषिकेशमधील तिच्या घरी साजरी करते आहे.
नेहाचा होळीचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिने हा व्हिडिओ काही तासांपूर्वीच पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ १.९ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.